मुंबई - कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तिने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल असहनीय गलिच्छ भाषा वापरून स्वतःची लायकीही तिने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राला उर्मिला मातोंडकर यांचा अभिमान असून त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध करत कंगनाच्या मुखातून वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपने १३ कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
'कंगनाच्या मुखातून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या भाजपने तात्काळ माफी मागावी' - सचिन सावंताची भाजपवर टीका बातमी
भारतीय जनता पक्षाने मागील सहा वर्षात मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कंगना ही भाजपची नवीन कळसुत्री बाहुली आहे. तिने उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती ऐकून महाराष्ट्रातील जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. यामुळे कंगना व भाजप महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.