मुंबई - राज्यात सत्तेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजपने सत्तेसाठी दावा केला नसताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी व माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी बोरिवली पश्चिम येथे महायज्ञ केले. यामुळे आता सर्व पर्याय संपल्याने देवच काही तरी करू शकतील, या भावनेतून महायज्ञ करण्यात आला.
हेही वाचा... राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू; जाणून घ्या कलम ३५६
महाराष्ट्र विधसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. निकाल लागून 17 दिवस झाले तरीही अद्याप राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार अस्तित्वात आलेले नाही. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनावेत म्हणून मुंबईच्या सायन येथील आमदार तामील सेलव्हन यांनी काही दिवसांपूर्वी होमहवन केले होते.
हेही वाचा... राज्यपालांची भूमिका संशयास्पद - प्रकाश शेंडगे
भाजपने राज्यात आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे राज्यपालांना सांगितले होते. हा प्रकार ताजा असताना राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेस सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली. या दरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे राज्यात भाजपचे सरकार स्थापन होऊन त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनावेत यासाठी बोरिवली पश्चिम येथे आमदार चौधरी व माजी आमदार हेमेंद्रा मेहता यांनी महायज्ञ केले. यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये आणि राज्यातील आमदारांना सुबुद्धी देऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनावेत, असे साकडे भाजप आमदारांनी घातले.