ETV Bharat / city

Rahul Narvekar : भाजपचा पुन्हा नवीन डाव, शिवसेनेमधून आलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी - कोण आहेत राहुल नार्वेकर मराठी बातमी

आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला ( Rahul Narvekar Filed Application Assembly Speaker ) आहे.

Rahul Narvekar
Rahul Narvekar
author img

By

Published : Jul 1, 2022, 4:09 PM IST

Updated : Jul 1, 2022, 5:04 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadnavis ) पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर झाला आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ( Rahul Narvekar Filed Application Assembly Speaker ) आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने आणखी धक्का भाजपने दिला आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाने गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यासाठी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर? - राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत. तसेच, ते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावाई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा परिसरात नगरसेवक होते. राहुल नार्वेकर पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, 2014 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले. त्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले होते.

'या' दिवशी होणार अधिवेशन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवले आहे. शनिवारी आणि रविवारी अर्थात 2 व 3 जुलैला हे अधिवेशन होणार होते. मात्र, आता 3 आणि 4 जुलै म्हणजेच रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे.

हेही वाचा - Aarey Car Shed : मुख्यमंत्री शिंदेंच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रोचे कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय

Last Updated : Jul 1, 2022, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.