मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ सध्या कुर्ला येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
'लढेंगे भी जितेंगे भी' कार्यकर्त्यांचा नारा
कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये वी स्टँड विथ नवाब मलिक (we stand with nawab malik) या हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. तसेच 'लगा लेना ईडी से लेके सीबीआय तक का जोर, लढेंगे भी जितेंगे भी' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेविरोधात दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी (15 मार्च) निकाल दिला ( High Court Rejects Nawab Malik Plea ) असून नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मागील आठवड्यात या याचिकेवर चार दिवस युक्तिवाद झाली. न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. ( Mumbai High Court on Nawab Malik plea )
'तपास यंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरूनच'
मालिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे. केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरूनच आहे, मात्र नवाब मलिक यांच्या समोर रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालादरम्यान म्हटले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आता जामीन मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात पुन्हा रीतसर अर्ज करावा लागणार आहे.
हेही वाचा - होळीच्या रंगामुळे दोघांच्या डोळ्यांना इजा, रस्ते अपघातात ३० ते ४० जण किरकोळ जखमी