ETV Bharat / city

मंत्रालयातील गर्दीवर ‘लोकदरबार’चा उतारा, अशोक चव्हाण यांची नवी घोषणा - News about Congress

मंत्रालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लोक दरबारचे आयोजन करणार आहेत. पहीला लोक दरबार २२ जानेवारी २०२० ला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला.

ashok-chavan-organized-the-lok-darbar
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Jan 22, 2020, 2:49 PM IST

मुंबई - मंत्रालयात आपल्या विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही गैरसोय कमी होण्यासाठी लोकदरबारचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना थेट मंत्रालयात येण्याऐवजी त्यांच्या कामाचा निपटारा लोक दरबारमधून लवकर व्हावा, यासाठी चव्हाण यांनी आज घोषणा केली आहे.

आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन केले जाणार आहे. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःच दर बुधवारी दुपारी ३ वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टिक एमएलए हॉस्टेलच्या मागे, रिगल सर्कलजवळ, कुलाबा, मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. पहिला ‘लोकदरबार’ बुधवारी, २२ जानेवारी २०२० ला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आपली निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध होऊ शकेल, तसेच त्यांचा वेळ आणि श्रमही वाचतील. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:मंत्रालयातील गर्दीवर ‘लोकदरबार’चा उतारा, अशोक चव्हाण यांची नवी घोषणा

mh-mum-01-cong-pwd-mini-ashokchvan-lokdarbar-7201153

(यासाठी फाइल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. २१ :

मंत्रालयात आपल्या विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही गैरसोय कमी होण्यासाठी लोकदरबारचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना थेट मंत्रालयात येण्याऐवजी त्यांच्या कामाचा निपटारा लोकदरबार मधून लवकर व्हावा यासाठी चव्हाण यांनी आज घोषणा केली आहे.

आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन केले जाणार आहे.या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःच दर बुधवारी दुपारी ३ वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टिक एमएलए हॉस्टेलच्या मागे, रिगल सर्कलजवळ, कुलाबा, मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. पहिला ‘लोकदरबार’ बुधवारी, २२ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आपली निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध होऊ शकेल, तसेच त्यांचा वेळ आणि श्रमही वाचतील. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. Body:मंत्रालयातील गर्दीवर ‘लोकदरबार’चा उतारा, अशोक चव्हाण यांची नवी घोषणा

mh-mum-01-cong-pwd-mini-ashokchvan-lokdarbar-7201153

(यासाठी फाइल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. २१ :

मंत्रालयात आपल्या विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही गैरसोय कमी होण्यासाठी लोकदरबारचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना थेट मंत्रालयात येण्याऐवजी त्यांच्या कामाचा निपटारा लोकदरबार मधून लवकर व्हावा यासाठी चव्हाण यांनी आज घोषणा केली आहे.

आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन केले जाणार आहे.या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःच दर बुधवारी दुपारी ३ वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टिक एमएलए हॉस्टेलच्या मागे, रिगल सर्कलजवळ, कुलाबा, मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. पहिला ‘लोकदरबार’ बुधवारी, २२ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आपली निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध होऊ शकेल, तसेच त्यांचा वेळ आणि श्रमही वाचतील. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.