ETV Bharat / city

आर्यनचा जामिनाचा मार्ग मोकळा; पाहा, दिवसभरात कोर्टात काय घडलं? - cruise drug case

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

aryan khan
आर्यन खान
author img

By

Published : Oct 7, 2021, 3:09 PM IST

Updated : Oct 7, 2021, 8:19 PM IST

मुंबई - आज(7 ऑक्टोबर) या आठ जणांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) यांच्या कोर्टात हजर केले. यावेळी आरोपींचे वकील आणि एनसीबीच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचासह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आर्यन खानसह इतर आरोपींच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, उद्या (8 ऑक्टोबर) त्यावर सुनावणी होणार आहे.

दिवसभरात कोर्टात काय घडलं, वाचा -

आर्यन खानसह इतर 7 जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आर्यन खानसह अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

आर्यनच्या चेहऱ्यावर तणाव

न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आर्यन खान उभाच आहे. प्रदीर्घ वादामुळे आर्यनच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून येत आहे.

NCB ने आज एका मेन ड्रग सप्लायरला अटक केली - अनिल सिंह

NCB कडून अनिल सिंह बाजू मांडत आहेत. ते म्हणतात की, आज आम्ही पुन्हा एका ड्रग्स सप्लायरला अटक केली आहे. क्रूझ पार्टीच्या अर्धा तास अगोदर एका आरोपीला एनसीबीने ताब्यात घेतले होते.

कोर्टात अनिल सिंह आणि मानेशिंदे यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू

आता कोर्टात अनिल सिंह आणि मानेशिंदे यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दोघेही एकमेकांना क्रॉस करत आहेत. न्यायाधीशांच्या मध्यस्थीने वाद सुरू झाला.

आठही आरोपींचा एकमेकांशी संबंध - अनिल सिंह

अनिल सिंग एनसीबीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. यावेळी एनसीबीची बाजू मांडताना या आठही आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे, असा दावा केला. एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आज दुपारी ड्रग्ज पुरवणाऱ्या मुख्य सप्लायरला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असेदेखील अनिल सिंह म्हणाले

एनसीबी नवीन व्यक्तींना अटक करत आहे, त्याचा आर्यनशी काही संबंध - मानेशिंदे

आर्यनचे वकील मानेशिंदे म्हणाले, एनसीबी नवीन व्यक्तींना अटक करत आहे, त्याचा आर्यनशी काही संबंध नाहीत. आता क्रूझमधील पार्टी आयोजकांना अटक केली आहे. जर क्रूझमधील इतर कोणाशीही माझे कोणतेही संबंध असल्यास षड्यंत्र होईल का? आर्यनला मित्र प्रतीक गाबा याने क्रूझवर व्हिआयपी म्हणुन आमंत्रित केले होते.

आर्यनची अरबाजसोबत मैत्री, पण बाकीच्या गोष्टींशी संबंध नाही; मानेशिंदेंचा युक्तिवाद

आर्यन खानची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की, आर्यनची अरबाजसोबत मैत्री आहे. पण त्याचा बाकीच्या कोणत्याही गोष्टींशी संबंध नाही.

आर्यनची प्रतिकसोबत चॅटिंग, त्यात पार्टीचा उल्लेख नाही - मानेशिंदे

कोर्टात आर्यनची बाजू मांडताना मानेशिंदे म्हणाले की, आर्यनने प्रतिकसोबत चॅटिंग केलेली आहे. या चॅटमध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. प्रतिकची अरबाजसोबत ओळख आहे. त्यामुळे प्रतिकने अरबाजला स्वतंत्र बोलावले होते. अरबाज आणि आर्यन सोबत गेले नाहीत.

आर्यन खानसह आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी - एएसजी अनिल सिंह

आर्यन खानसह आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची कोर्टाकडे मागणी

सतीश मानशिंदेने आर्यन खानची बाजू आता कोर्टात मांडत आहेत.

अनिल सिंह बाजू मांडताना -

एनसीबीने अटक केलेल्या अर्चित कुमारचे नाव आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या चौकशीत समोर आले होते. सर्वांना एकत्र बसून चौकशी करणे गरजेचे आहे. या करिता रिमांडची आवश्यकता आहे, आता पहिल्या टप्प्यात चौकशी आहे.

अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आर. एम. निर्लेकर-

एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 अन्वये निवेदन नोंदवण्यात आले.

एनसीबीने युक्तिवाद केला की तो गांजा तस्करी नेटवर्कचा भाग आहे. तो प्राथमिक टप्प्यावर आहे.

ते म्हणाले की, अशा अटकेची परवानगी केवळ विशेष परिस्थितीतच दिली जाऊ शकते.

अर्चित कुमारला 9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

NCBचे वकील सेठना - कृपया त्यांचा अर्ज पाहा. तो असे म्हणत नाही की अटक मेमो हा बनावट आहे.

त्यांचा युक्तिवाद असा आहे की, जर तुम्ही त्याला 5 तारखेला उचलले तर तुम्हाला त्याला 6 तारखेला सादर करावे लागेल. एमसीबीचे अधिकारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे.

औषधांचा गैरवापर हा एक घातक ट्यूमरसारखा होत आहे..

बचाव पक्ष -

हा खोटारडापणा बंद व्हायला हवा

कोर्टाने निर्णय घेण्याची गरज

ड्रग्स गांजा घेणारे आरोपी नाहीत, ते तर व्हिकटीम आहेत

कोणत्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहेत हे सिद्ध झालेले नाही, म्हणून जामीन द्यावा

न्यायालयात युक्तिवादाला सुरुवात

अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह आल्यावर होणार सुनावणी

आर्यन खानच्या वकिलांनी कुटुंबातील सदस्यासोबत सुनावणी सुरू होण्यापूर्वी आरोपीला भेटण्याची परवानगी मागितली आहे

ड्रग्स पार्टी प्रकरणात NCB ने 11 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान आणि इतर सात आरोपींची एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. या मागणी मागण्यासाठी रिमांड अर्ज सादर केला.

समीर वानखडे कोर्ट रूममध्ये पोहचले

शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला कोर्ट नंबर 8 च्या शेजारील रूममध्ये आणून बसविले आहे.

महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या 8 नंबर कोर्टात सुनावणी होणार

आज फक्त आठ जणांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. पवईमधून अटक केलेल्या अर्चित आणि बांद्रामधून पकडलेल्या नाइजीरियन आरोपीला आज कोर्टात हजर नाही करणार

आर्यन खानचे वकील मानेशिंदे यांनी आर्यनला भेटण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी मागितला, जजने त्यांना अनुमती दिली आहे.

आर्यनला घेऊन एनसीबी कोर्टात दाखल

मानेशिंदेबरोबर शाहरुखची मॅनेजर आर्यनला भेटण्यासाठी पोहचली

कोर्टात सुनावणी सुरू होण्यापूर्वी दोन मिनिटं आर्यनशी बोलण्याची विनंती

समीर वानखडे कोर्टात हजर

मुंबई - क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज किल्ला कोर्टात आर्यन खानला जामीन मिळणार की, कारागृहातील त्याचा मुक्काम वाढणार याचा फैसला आज होणार आहे.

  • आज होणार निर्णय-

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. त्यानंतर, सोमवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला कोर्टात हरज करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने (7 ऑक्टोबर)पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आज या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून, यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • प्रकरणात आतापर्यत १७ जणांना अटक-

एकीकडे एनसीबीकडून ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जात असताना आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना एनसीबीने मंगळवारी अटक केली होती. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. त्यांना काल कोर्टात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. काल एनसीबीने अनेक ठिकाणी छापे मारून रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन, एनसीबी कार्यालयात नेले. अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे, त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे, त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत. यामुळे याप्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १७ वर पोहचली आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : एका परदेशी नागरिकाला एनसीबीने केली अटक, ड्रग्स पुरवठा केल्याचा आरोप

Last Updated : Oct 7, 2021, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.