मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) परिसरातील ८० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, काम सुरु झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde On Redevelopment Huts ) यांनी दिली आहे.
पुनर्वसनाची अधिसूचना जारी
विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावातील शेर बदलास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ३७ अन्वये मंजुरी देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यानूसार विमानपत्तन प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची कार्यवाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर ( Mumbai Metropolitan Region Development Authority ) नियोजित करण्यात आली आहे.
प्रीमियर कंपाउंड कुर्ला येथे पुनर्वसन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी सध्या प्रीमियर कंपाउंड कुर्ला येथील जागेवर बांधलेली हस्तांतरित केली जाणार आहे. यासाठी प्रत्यक्ष जागेवर बांधण्यात आलेली बांधकामे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून 'जसे आहेत तशा' स्थितीत हस्तांतरित केली जाणार आहे. 'झोपडपट्टी धारकांना आवश्यक त्या इतर जागा अथवा सदनिका उपलब्ध करून घेऊन पुनर्वसनाची कार्यवाही ताबडतोब करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याची माहिती एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde On Redevelopment Huts ) यांनी दिली.'
हेही वाचा -Vaishno Devi Bhawan Stampede : वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरीमुळे 12 भाविकांचा मृत्यू