ETV Bharat / city

गिरगावमधील आशिष क्लबचा दोन महिन्यांचा डीव्हीआर एनआयएने घेतला ताब्यात

author img

By

Published : Apr 2, 2021, 3:09 PM IST

Updated : Apr 2, 2021, 10:24 PM IST

mumbai
संग्रहित छायाचित्र

22:23 April 02

अँटिलिया प्रकरणी आठवी गाडी एनआयएच्या ताब्यात

मुंबई - अँटिलिया प्रकरणी एनआयएने आठवी गाडी ताब्यात घेतली आहे. सफेद रंगाची ही मर्सिडीज गाडी आहे. ही गाडी सचिन वाझे चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरणात मर्सिडीज गाडीची महत्वाची भूमिका आहे. मागील अनेक दिवसांपासून या गाडीचा एनआयए शोध घेत होती.  

19:19 April 02

सोशल क्लबचा दोन महिन्यांचा डीव्हीआर 'एनआयए'कडून जप्त

मुंबई - एक एप्रिलला 'एनआयए'ने गिरगाव चौपाटी नजीक एका कल्चर क्लबवर छापा टाकला होता. हा क्लब आशिष सोशल क्लब या नावाने ओळखला जात होता. या क्लबच्या आतमध्ये जुगार अड्डा होता. एनआयएने छापा टाकल्यानंतर या क्लबमधून अनेक लोकं बाहेर पडले. दरम्यान, एनआयएने सोशल क्लबमधील सगळे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत.

19:17 April 02

मिस्ट्री वूमन एनआयएच्या कार्यालयात दाखल

मुंबई - एनआयएच्या कार्यालयामध्ये एका महिलेला आणण्यात आले आहे. महिलेचा संपूर्ण चेहरा स्कार्फनं झाकला होता. महिलेला कार्यालयात आणताना एनआयएकडून कमालीची दक्षता बाळगण्यात आली होती. महिलेची ओळख पटू नये म्हणून मागच्या गेटने महिलेला कार्यालयात आणण्यात आले आहे. महिलेचा चेहरा दिसू नये म्हणून मागच्या गेट समोर एनआयएने गेटजवळ एक गाडी आडवी उभी केली होती. त्यामुळे ही मिस्ट्री महिला नेमकी कोण? याबाबत अजून माहिती मिळाली नाही. 

16:35 April 02

वाझेला पोलीस खात्यात घेण्याचे काम शिवसेनेचेच - नारायण राणे

मुंबई - सरकार फसवाफसवीचे धंदे करत आहे. एक API सचिन वाझे हा ओबेरॉय हॉटेलमध्ये राहतो, त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. अशा माणसाला पोलीस खात्यामध्ये घेण्याचे काम शिवसेनेचेच असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.    

15:07 April 02

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सोमवारी फैसला

मुंबई- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय 5 एप्रिलला निर्णय देणार आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या बदलीला आव्हान देणारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

14:54 April 02

LIVE Updates : अँटिलिया, हिरेन हत्याकांड, परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणाचे ताजे अपडेट्स

कोल्हापूर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे डार्लिंग आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Last Updated : Apr 2, 2021, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.