मुंबई - मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या ( Anti Narcotics Cell Raids 2 Places ) आहेत. त्यामध्ये घाटकोपर युनिटने केलेल्या कारवाईत 38 किलो गांजा आणि आझाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईत 56 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या दोन्ही अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 13 लाख 70 हजार रुपये आहे. दोन्ही प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली ( Anti Narcotics Cell Arrested Three People ) असून, पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.
मंगळवारी अंमली पदार्थाच्या घाटकोपर युनिटने रात्री 7.30 च्या सुमारास 38 किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत 8 लाख रुपये आहे. याप्रकरणी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. घाटकोपरच्या वैतागवाडी येथील पीडब्ल्यूडी सिमेंट गोडाऊन येथून हे दोन्ही आरोपी गांजाच्या गोणी घेऊन जात होते. त्यांच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तपासणी केली असता त्यांच्याजवळ हे अंमली पदार्थ आढळून आले आहे.
तर दुसरीकडे अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने बुधवारी ( 16 मार्च ) रोजी 56 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या एमडी ड्रग्जची किंमत 5 लाख 70 हजार आहे. एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा धारावीचा राहणारा आहे. आयुबवर शाहू नगर पोलिसांच्या हद्दीत मारामारी व इतर गुन्ह्यात सहभागी असल्याचेही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अंमली पदार्थ विभागाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Phone Tapping Case : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची कुलाबा पोलिसांकडून 2 तास चौकशी