ETV Bharat / city

गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता - परिवहन मंत्री - transport minister anil parab

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. नियमांचे पालन करून एसटीने गणेशोत्सव कोकणात जाऊन साजरा करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

maharashtra state transport
गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता - परिवहन मंत्री
author img

By

Published : Jul 20, 2020, 6:28 PM IST

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. नियमांचे पालन करून एसटीने गणेशोत्सव कोकणात जाऊन साजरा करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता - परिवहन मंत्री

दरवर्षी मुंबई, ठाणे तसेच अन्य शहरामधून गावी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी गर्दी असते. यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे कऱण्यावर पाणी पडले आहे. गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे सावट कायम आहे. मात्र, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नोकरदार वर्गाला अटी आणि शर्तींसह राज्य परिवहन महामंडळाची सेवा उपलब्ध होणार आहे.

मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे, असे ते म्हणाले. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. कोकणात ज्यांची घर बंद आहेत, आणि गणोशोत्सवसाठी थेट जाणार आहेत, त्यांच्यासाठी उपाययोजना करणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. एक दिवसाच्या दर्शनाला जाणाऱ्या चाकरमान्यांबाबत देखील विचार विनिमय करून लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात गर्दी होणार नाही; त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेत साधेपणाने गणोशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असेही परब यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.