मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंद केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत.
हेही वाचा - घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- सीबीआयचा प्राथमिक अहवाल व्हायरल?
मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीम त्या दोघांना घेऊन गेली होती. काही दिवसांपूर्वी देशमुख प्रकरणातील सीबीआयचा प्राथमिक अहवाल व्हायरल झाला होता. याच प्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.
- काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. पण एकदाही अऩिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुका जाहीर करू नये - देवेंद्र फडणवीस