मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 Crore Alleged Recovery Case ) अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत ( Judicial Custody ) आहे. त्यांची आज (सोमवारी) न्यायालयीन कोठडी संपली, असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान अनिल देशमुख यांना 20 जानेवारीपर्यंत 10 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ( 10 Days Judicial Custody ) पाठवण्यात आले आहे. ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 70 दिवसांपासून अनिल देशमुख हे कोठडीत आहे.
ईडीकडून अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना 15 दिवस ईडी कस्टडीमध्ये देखील ठेवले होते. गेल्या 70 दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे. मागील 27 डिसेंबर रोजी अनिल देशमुख यांना न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पुन्हा न्यायालय कोठडी सुनावली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान अनिल देशमुख यांना 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी पाठविण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे तूर्तास तरी अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी करता अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने विरोध दर्शवला असून अनिल देशमुख यांनी जामिनासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. आता उद्या न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - Lawyer Inderpal Singh in trouble : अनिल देशमुख यांच्यानंतर वकील इंद्रपाल सिंगही अडचणीत; अटकेची टांगती तलवार