मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din)येणाऱ्यांना दरवर्षी पालिका प्रशासनाकडून सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हात आखडता घेतल्याने आंबेडकरी अनुयायांमधील नाराजी उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. काही गैरसमजातून हा प्रकार झाला असून यापुढे असे होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
अनुयायांमध्ये संतापाची लाट -
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas )रविवारपासून आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मुंबईत आले आहेत. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आंबेडकरी अनुयायांसाठी राहण्याची, खाण्याची आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जाते. पुस्तकांचे स्टॉल भरण्यास परवानगी दिली जाते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असल्याने पालिकेने यंदा चैत्यभूमीचा परिसर वगळता इतर ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. आंबेडकरी अनुयायांमध्ये यामुळे संतापाची लाट होती. ही लाट दुपारनंतर उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
Mahaparinirvan Diwas : आंबेडकरी अनुयायांची प्रशासनाविरोधातील नाराजी उफाळून आली - आनंदराज आंबेडकर - महापरिनिर्वाण दिवस चैत्यभूमी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) येणाऱ्यांना दरवर्षी पालिका प्रशासनाकडून सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हात आखडता घेतल्याने आंबेडकरी अनुयायांमधील नाराजी उफाळून आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. काही गैरसमजातून हा प्रकार झाला असून यापुढे असे होणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.