ETV Bharat / city

BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी - BMC Election

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ( Mumbai Municipal Corporation Election ) राष्ट्रवादी काँग्रेसने ( Nationalist Congress ) जोरदार तयारी केली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ( Mumbai Nationalist Congress ) ताकद वाढवण्यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) मैदानात उतरणार असल्याचे मत विश्लेषकांनकडून व्यक्त केलं जातं आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jul 20, 2022, 5:16 PM IST

मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ( Mumbai Municipal Corporation Election ) राष्ट्रवादी काँग्रेसने ( Nationalist Congress ) जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार रिंगणात उतरणार आहेत. त्यातच या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत यावं यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी साद घातली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ( Mumbai Nationalist Congress ) ताकद वाढवण्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याचे मत विश्लेषकांनकडून व्यक्त केलं जातं आहे.

Sharad Pawar
शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी - होऊ घातलेल्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Mumbai Municipal Corporation Election ) सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीला विशेष महत्त्व आला आहे. काल 19 जुलै रोजी याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर मुंबई महानगरपालिकेवर असलेली पंचवीस वर्षाची शिवसेनेची सत्ता पालटण्याची स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना हाताशी धरून भारतीय जनता पक्ष ( Bharatiya Janata Party ) पहात आहे. मात्र यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेत नेहमी अपयश येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळावं यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वेळी मैदानात असणार आहेत. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून यावेळी वेगळी योजना आखली जात आहे.

शरद पवार देणार विशेष लक्ष - मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत तरी हवं तसं यश आलेले पाहायला मिळत नाही. वार्ड पुनर्रचनेनंतर 227 असलेली संख्या आता वाढून 236 वर पोहचली आहे. मात्र, सध्या मुंबई महानगरपालिकेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक होते. मुंबईसारख्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही आपले अस्तित्व हवं तसं उभा करता आलेलं नाही. त्यामुळे होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लक्ष घालणार आहेत. यासाठी त्यांनी महानगरपालिका संबंधित आपल्या नेतेमंडळींच्या बैठका सुरू केले आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः प्रचाराला उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. स्वतः पवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मुंबईमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना, नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. तसेच शरद पवारांनी प्रचार केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा नक्कीच आधी पेक्षा जादा येतील अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची सर्व धुरा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्याकडे दिली होती. महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi Govt ) स्थापन झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाबतच्या तयारी सुरू केल्या होत्या. याबाबतच्या सातत्याने बैठका आढावा नवाब मलिक यांच्या कडून घेतला जात होता. मात्र, नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शरद पवारांकडून इतर नेत्यांची फळी उभी करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) या देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घालून आहेत. तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनाही पुढे जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. यासोबतच मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ अशी नेत्यांची फळी तयार करण्यात आली आहे.

शिवसेनेसोबत आघाडीची शक्यता - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची आघाडी होण्याची शक्यता स्वतः शरद पावर यांनी वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी ताकत एक झाल्यास मोठा परिणाम पाहायला मिळेल असे संकेत शरद पवारांनी दिले होते. मात्र, याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. पण अद्याप महानगरपालिकेचे निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली जाईल का? यावर शिवसेनेकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

मुंबईच्या परिसरात असणार अधिक लक्ष - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी मुंबईतील काही भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी कुर्ला परिसरात येणारे वार्ड, रमाबाई नगर तसेच मुस्लिम किंवा दलित वस्ती असलेल्या भागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले लक्ष केंद्रित केल आहे. याच भागातून अधिकाधिक नगरसेवक निवडून येण्याची जास्त शक्यता पक्षाला असल्याचे मुंबईचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे ( Narendra Rane ) यांनी म्हंटल आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची वेगवेगळे मुद्दे येऊन अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्या परिसरात महानगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. त्यामुळेच या परिसरात असलेला वार्डवर निवडणुकीमध्ये अधिक लक्ष दिले जाणार आहे.

हेही वाचा - Businessman Commits Suicide In Nagpur : नागपूरमध्ये व्यावसायीकाची आत्महत्या, कार पेटवून सहकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न

राष्ट्रवादीला मुंबईत संधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीपासूनच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेला हा पक्ष राहिला आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईसारख्या शहरामध्ये आपलं अस्तित्व तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप तरी यश आलं असल्याचं दिसतंय. राज्यात अनेक वर्ष सत्तेत असूनही मुंबईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपली छाप पाडता आलेली नाही. आताही पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेत केवळ 9 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अनेक प्रयत्न करूनही राष्ट्रवादीला हव असलेला यश मुंबईत त्यांना मिळवता आलेले नाही याची खंत शरद पवार यांना नक्कीच आहे. त्यातच त्यांचे वय पाहता या निवडणुकीत त्यांनी आपली पूर्ण ताकद लावून राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईसारख्या शहरात वर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच जर राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेची साथ या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळाली तर त्याचा काहीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे हे शरद पवारांना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला साद घातली असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Agneepath scheme hearing: अग्निपथ योजनेसंदर्भातील याचिकांवर आता 25 ऑगस्टला सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.