मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वझे यांचं नाव समोर येत आहे. विधान भवनात त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील विरोधकांकडून केली जाते. अज्ञात कार माझा पाठलाग करत असल्याचा दावा सचिन वझे यांनी केला आहे.
हेही वाचा - सरकारने दिलेल्या जमिनीवर रामदेव बाबासह अंबानी कधी उद्योग उभे करणार?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली आहे. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वझे यांची भूमिका संशयास्पद असल्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वर्तवली आहे.
हेही वाचा - युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर