ETV Bharat / city

100 cr Extortion Case : अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची ईडीकडून चौकशी होणार

author img

By

Published : Dec 17, 2021, 10:27 AM IST

100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100 cr Extortion Case) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी जी. श्रीधर (Akola Superintendent of Police G Sridhar summoned by ED) ला ईडी कार्यालयाला बोलवण्यात आले आहे.

100 cr Extortion
100 cr Extortion

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home जेलमध्ये आहे. आता या प्रकरणात अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना सक्तवसुली संचलनालयाने ED समन्स जारी (Akola Superintendent of Police G Sridhar summoned by ED) केला आहे. यानुसार त्यांना आज (दि.17) रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांच्यासंबंधी मनी लाँडरिंगचं प्रकरण सुरू आहे. खंडणी प्रकरणातही त्यांची चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (IPS G.Shreedhar) यांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर या प्रकरणात श्रीधर यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुखांना द्यावा लागला राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Police Mumbai police commissioner Param Bir Singh) यांनी 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर आणि वाझेशी असणारे संबंध उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरूच आहे. देशमुख यांच्याशी निगडीत विविध मालमत्तांवर ईडीने याआधीच छापे देखील टाकले. प्रकरण इथेच नाही थांबलं, तर या कथित घोटाळ्यासंदर्भात चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यानुसार वाझे आणि देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनाही चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

प्रकरण काय..?

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तर दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सिंह यांचा शोध घेत आहे. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, त्याआधीच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आले. तसेच या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - परमबीर सिंह अन् शिवसेनेचे साटेलोटे, अतुल भातखळकर यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.