मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहे. भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरुवात केली आहे. यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या करात घट झाल्याचे सांगितले.
केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळणाऱ्या करात ८ हजार ४५३ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांचा खर्च २ लाख ४८ हजार कोटी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून निधी कमी मिळत असल्याचे सांगत त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची कविता म्हणून दाखवून दिली. असफलता ही चुनौती है, क्या कम है उसे सुधारणा करो. त्यांच्या कवितेवर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजविली आहेत.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने केवळ ९०० कोटी रुपये दिले आहेत. राज्याने स्वत:च्या निधीमधून मदत केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.