ETV Bharat / city

Ajay Chaudhary as Shiv Sena group Leader : शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नियुक्तिपत्र

शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी ( Shinde Fired From Group Post ) केलेली आहे. आता शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी ( Ajay Chaudhary as Shiv Sena Group Leader ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचे अधिकृत पत्र विधान सभा उपाध्यक्ष ( Deputy Speaker of the Legislative Assembly ) नरहरी झिरवाळ ( Narhari Jirwal ) यांना देण्यात आले आहे. यासंबंधी शिवसेनेच्या महत्त्वाचे नेत्यांनी विधान सभा उपाध्यक्षांची भेट घेतली. त्यांना हे पत्र देण्यात आले आहे. शिवसेना गटनेते नियुक्तिपत्र ( Group Leader Appointment Letter ) उपाध्यक्षांना देताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.

Letter to Shiv Sena Vice President Narhari Jirwal
शिवसेनेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांना पत्र
author img

By

Published : Jun 21, 2022, 7:09 PM IST

Updated : Jun 21, 2022, 7:52 PM IST

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याची शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून तत्काळ उचलबांगडी ( Shinde Fired From Group Post ) केली. परळ-शिवडीमधील कट्टर शिवसैनिक आणि आमदार अजय चौधरी यांची गटनेतापदी वर्णी लागली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना या संदर्भातील पत्र आज देण्यात आले.

विधानसभा उपाध्यक्षांना नियुक्तिपत्र : यासंबंधी शिवसेनेच्या महत्त्वाचे नेत्यांनी विधान सभा उपाध्यक्षांची ( Deputy Speaker of the Legislative Assembly ) भेट घेतली. त्यांना हे पत्र देण्यात आले आहे. शिवसेना गटनेते नियुक्तिपत्र ( Group Leader Appointment Letter )उपाध्यक्षांना ( Narhari Jirwal ) देताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.

गटनेते पदावरून शिंदे यांची हकालपट्टी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून शिंदे यांना हटवण्यात आले. त्याऐवजी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना देण्यात आले. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी त्यावर सूचक अनुमोदन दिले आहे. तर उदय सामंत, राजन साळवी यांनी अनुमोदन दिलेले पत्र उपाध्यक्ष झिरवळ यांना विधिमंडळात देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून काढून टाकल्याने शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

महाविकास आघाडीत पुन्हा एकदा गटनेते पदाची पुनरावृत्ती : २०१९ ला विधान सभेच्या सत्ता स्थापनेकाळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकून सत्ता स्थापन केली. त्यावेळी अजित पवार विधी मंडळाचे गटनेते होते. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांना तत्काळ गटनेते पदावरून हटवून त्याजागी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आणि तशी नोंदणी विधिमंडळ कार्यालयात जाऊन करण्यात आली. गटनेतेपदी एकनाथ शिंदे हे राहिले तर काही दगाफटका होण्याची शक्यता नको, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तत्काळ गटनेते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

गटनेते पदामुळे अस्तित्व येऊ शकते धोक्यात : गटनेते पदामुळे काय होऊ शकते याची जाणीव पक्षप्रमुखांना असल्यामुळे त्यांनी ताबडतोब शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी केली आहे. गटनेते पद एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिले तरआमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. यामुळे सरकार धोक्यात येऊ शकते. या शक्यतेमुळे त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

हेही वाचा : पक्षांतर बंदी कायद्याचा एकनाथ शिंदेंना फायदा होणार का, वाचा आकड्याचे गणित

Last Updated : Jun 21, 2022, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.