ETV Bharat / city

TB Disease Risk Mumbai : मुंबईकरांना कोरोनानंतर टीबीचा धोका अधिक, पालिकेकडून स्क्रिनिंग सुरू - मुंबईकरांना कोरोना नंतर टीबीचा धोका

मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार (Corona spread in Mumbai) आहे. या कालावधीत साडे अकरा लाख मुंबईकरांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यापैकी अनेक रुग्ण बरे झाले असले तरी त्यानंतर त्यांना टीबी आजाराचा धोका (TB disease risk is more for Mumbai citizens) असल्याचे समोर आले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सर्व रुग्णालयांमध्ये स्क्रिनिंग सुरू (TB Screening starts from BMC) करण्यात आले आहे. ज्यांना कोरोनानंतर टीबी (TB spread in Mumbai) झाला आहे किंवा तशी लक्षणे आहेत, अशा रुग्णांनी पालिकेच्या जवळच्या रुग्णालयात तपासणी (TB patient screening by BMC) करून घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Mumbai BMC News)

TB Disease Risk Mumbai
TB Disease Risk Mumbai
author img

By

Published : Oct 7, 2022, 3:45 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार (Corona spread in Mumbai) आहे. या कालावधीत साडे अकरा लाख मुंबईकरांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यापैकी अनेक रुग्ण बरे झाले असले तरी त्यानंतर त्यांना टीबी आजाराचा धोका (TB disease risk is more for Mumbai citizens) असल्याचे समोर आले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सर्व रुग्णालयांमध्ये स्क्रिनिंग सुरू (TB Screening starts from BMC) करण्यात आले आहे. ज्यांना कोरोनानंतर टीबी (TB spread in Mumbai) झाला आहे किंवा तशी लक्षणे आहेत, अशा रुग्णांनी पालिकेच्या जवळच्या रुग्णालयात तपासणी (TB patient screening by BMC) करून घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Mumbai BMC News)

कोरोनानंतर टीबीचा धोका : मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या अडीच वर्षांत ११ लाख ५० हजार ४८० नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी ११ लाख ३० हजार ०४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अडीच वर्षात कोरोनाच्या चार लाटा आल्या असून त्या लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या रोज शंभरच्या सुमारास रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना झाल्यानंतर पोस्ट कोविड आजार होत असल्याचे समोर आले आहे. कोरोना झाल्यानंतर खोकल्याचा त्रास असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. अशांना टीबीचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांची पालिकेने सर्व रुग्णालयात स्क्रिनिंग सुरु केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोविड रुग्णांची माहिती उपलब्ध असल्याने रुग्णांचे स्क्रिनिंग करून त्याचा अहवाल करणेही सोपे जाणार आहे. पालिकेच्या सर्व वॉर्डातील रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध असून स्क्रिनिंग सुरूही झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ज्यांना खोकल्याचा त्रास असेल अशा रुग्णांनी पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

४० लाख लोकांची होणार तपासणी : या अनुषंगाने मुंबईतील सुमारे ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ इतक्या लोकसंख्येची तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या टीमद्वारे केली जाणार आहे. यासाठी २ हजार ८२९ टीम कार्यरत आहेत. या टीम सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत गृहभेटी देणार आहेत. या प्रत्येक टीममध्ये एक महिला, एक आरोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक; अशा ३ व्यक्तिंचा समावेश असणार आहे. या गृहभेटीदरम्यान एखाद्या घरातील कोणताही सदस्य उपलब्ध नसल्यास, ही टीम त्या घराला घरातील सदस्यांच्या उपलब्धतेनुसार पुन्हा भेट देणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधी दरम्यान ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ (Active Case Finding / ACS) राबविण्यात येत आहे तसेच याचसोबत कुष्ठरोग शोध अभियान (Leprosy Case Detection Campaign / LCDC) राबविण्यात येत असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.