ETV Bharat / city

BMC Budget 2022 : भाजपाचा सत्ताधाऱ्यांना दणका, स्थायी समितीतील 650 कोटींचा फेरफार रद्द

स्थायी समितीने यंदाचा अर्थसंकल्प सादर ( BMC Budget 2022 ) करताना 650 कोटी रुपयांचा फेरफार केला होता. त्याविरोधात भाजपाने आक्षेप घेत पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ( Commissioner Iqbal Singh Chahal ) पत्र दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी हा फेरफार रद्द केला ( Canceled 650 Crore Bmc Budget ) आहे.

author img

By

Published : Mar 2, 2022, 4:22 PM IST

BMC
BMC

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ चा ( BMC Budget 2022 ) ४५ हजार ९०० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. स्थायी समितीमध्ये हा अर्थसंकल्प मंजूर करताना त्यात 650 कोटी रुपयांचा फेरफार करण्यात आला होता. त्या फेरफाराला भाजपाने आक्षेप घेत पालिका आयुक्तांना पत्र दिले ( Commissioner Iqbal Singh Chahal ) होते. त्यानंतर आयुक्तांनी हा फेरफार रद्द केल्याचे ( Canceled 650 Crore Bmc Budget ) भाजपाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

अयोग्य फेरफार रद्द झाला

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ६५० कोटींचा फेरफार होणार, अशी घोषणा स्थायी समिती अध्यक्षांनी केली होती. त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता. आता नवीन प्रभाग रचना होत असून, निवडणुकीनंतर नवीन नगरसेवक येणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात काय फेरफार करावा? निधीमध्ये काय वाढ करावी? हा निर्णय नवीन सभागृहाने घेतला पाहिजे. सध्याच्या सभागृहाने हा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा ६५० कोटींचा फेरफार रद्द करावा, असे लेखी पत्र भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्तांना लिहिले होते.

या पत्राची दखल घेत पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्थायी समितीत होणारा ६५० कोटींचा फेरफार रद्द केला. हा भाजपाच्या पत्राचा परिणाम आहे की, 'आयकर धाडीचा?', असा उपरोधिक टोला स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी लगावत अयोग्य फेरफार रद्द झाला हे अधिक महत्त्वाचे आहे, अशी बोचरी टीका केली आहे.

तरतुदी केवळ काही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी

मुंबई महानगरपालिकेचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सादर करण्यात आला. त्यामध्ये स्थायी समिती स्तरावर अतिरिक्त अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करत असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. मुंबईमधील प्रभागांची सीमांकन अद्याप निश्चित झालेली नाहीत. असे असताना अर्थसंकल्पाव्यतिरिक्त अतिरिक्त निधीची तरतूद करताना मुंबई शहरातील कोणती कामे निश्चित करण्यात आलेली आहे?, अतिरिक्त कामांची शिफारस कोणी केली?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

तसेच, कामांची यादी निश्चित न करता अशा प्रकारची तरतूद करणे याचाच अर्थ करदात्यांकडून गोळा होणारा महसूल वाया, घालवण्याचा प्रकार आहे. अतिरिक्त तरतुदी केवळ काही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी होत आहे, अशी टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. भाजपा सर्वसामान्य मुंबईकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहील, असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा - Fadnavis Comment On Govt : महाविकास आघाडी सरकार दाऊद समर्पित - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.