ETV Bharat / city

विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय - student

विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Mar 29, 2019, 4:19 AM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करून मिळणार आहेत. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गुरुवारी (२८ मार्च) झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकित याबाबत ठराव करण्यात आला आहे. विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

आजमितीस मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने त्यांची शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थी विकास विभागामार्फत साक्षांकित करून दिली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची महाविद्यालयीन शैक्षणिक कागदपत्रे (ट्रांस्क्रीप्ट्स) महाविद्यालयाकडून दिली जातात. त्यानंतर विद्यार्थ्याना ती कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधून साक्षांकित करून घ्यावी लागतात. तसेच साक्षांकित केलेली कागदपत्रे वर्ल्ड एज्युकेशन सिस्टम तसेच कॅनेडा इमिग्रेशन सर्व्हिसकडे विद्यार्थी कुरीअरच्या माध्यमातून पाठवितात. यामध्ये जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी जातो. तसेच यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते अडीच हजार रुपयाचा खर्च पडतो.

मुंबई विद्यापीठ

विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक भूर्दंड आणि वेळेची बचत व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सुविधेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करून दिली जाणार आहे. तसेच पुढील प्रक्रियासुध्दा विद्यापीठामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशी यापासून सुटका मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून विद्यार्थ्यांना या सुविधेचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे. आजमितीस वर्षाला सुमारे पंधरा हजार विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सांक्षाकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असतात.

विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शैक्षणिक कागदपत्रे ;मुंबई विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, ता. 29 :
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार आहेत. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकित याबाबत ठराव करण्यात आला आहे. विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

आजमितीस मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने त्यांची शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थी विकास विभागामार्फत साक्षांकित करुन दिली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची महाविद्यालयीन शैक्षणिक कागदपत्रे (ट्रांस्क्रीप्ट्स) महाविद्यालयाकडून दिली जातात. त्यानंतर विद्यार्थ्याना ती कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधून साक्षांकित करुन घ्यावी लागतात. तसेच साक्षांकित केलेली कागदपत्रे वर्ल्ड एज्युकेशन सिस्टम तसेच कॅनेडा इमिग्रेशन सर्व्हिसकडे विद्यार्थी कुरीअरच्या माध्यमातून पाठवितात. यामध्ये जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी जातो. तसेच यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते अडीच हजार रुपयाचा खर्च पडतो. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक भूर्दंड आणि वेळेची बचत व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सुविधेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन दिली जाणार तसेच पुढील प्रक्रियासुध्दा विद्यापीठामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशी यापासून सुटका मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करुन परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे. 

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची अमलबजावणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असून विद्यार्थ्यांना या सुविधेचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे. आजमितीस वर्षाला सुमारे पंधरा हजार विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सांक्षाकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.