ETV Bharat / city

Kiran Dighavkar Transfer : राज्यात सत्ताबदल होताच आदित्य ठाकरेंच्या जवळील अधिकाऱ्याची बदली

राज्यात सत्ता बदल झालं आहे. सत्ता परिवर्तनानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या जवळचे असलेले जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली ( Officer Kiran Dighavkar Transfer ) आहे.

aaditya thackeray Kiran Dighavkar
aaditya thackeray Kiran Dighavkar
author img

By

Published : Jul 4, 2022, 8:19 PM IST

मुंबई - राज्यातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ता परिवर्तनानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या जवळचे असलेले जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली ( c ) आहे. दिघावकर यांच्या सह एकूण तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या जवळचे दिघावकर - मुंबई महानगरपालिकेत गेली २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्रीही होते. मार्च २०२० मध्ये मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. मुंबईमधील धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपड्पट्टीमधील कोरोनाला रोखण्याचे काम जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना देण्यात आली. धारावी मॉडेल राबवून दिघावकर यांनी कोरोनाचा प्रसार रोखला. तसेच, धारावीमधील कोरोनाचा आकडा शून्यावरही आणला होता. दादर चौपाटी चैत्यभूमी येथे विव्हिंग गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रेनवॉटर हार्वेस्टिंग, देशातील सर्वात मोठे कम्युनिटी टॉयलेट, माहीममध्ये नधीकृत बांधकाम केलेल्या लोकांसाठी कायमस्वरूपी पर्यायी घराची व्यवस्था करण्याचे काम किरण दिघावकर यांनी केले आहे.

दिघावकर यांची बदली - राज्यात सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. मंत्री व नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याजवळचे असलेले किरण दिघावकर स्थानिक आमदार सदा सरवणकर यांना कोणतीही मदत करत नव्हते. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमी कार्यशाळेत केलेल्या वाढीव बांधकामावर दिघावकर यांनी कारवाई केली होती. शिंदे गटात सामील झाल्यावर सरवणकर यांनी दिघावकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच दिघावकर यांची भायखळा येथील ई विभाग कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी के /पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालिकेतील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या - मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. दादर धारावी येथील जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भायखळा ई विभाग येथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी अंधेरी पश्चिम येथील के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांची बदली के -पूर्व विभागात करण्यात आली आहे.

हेही वाचा - Bhaskar Jadhav VS Devendra Fadnavis : जाधव VS फडणवीस; 'पंतप्रधानांच्या इच्छेनुसार, बाळासाहेबांच्या सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदी बसवले'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.