ETV Bharat / city

एप्रिलमध्ये घरविक्री, महसुलात मोठी घट; कोरोना व मुद्रांक शुल्क दरवाढीचा फटका - corona news

एप्रिलमध्ये राज्यात 94 हजार 813 घरे विकली गेली असून यातुन 1 हजार 256 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. तेच मार्चमध्ये तब्बल 2 लाख 13 हजार 413 घरे विकली गेली होती आणि यातून विक्रमी असा 9 हजार 66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकूणच एप्रिलमध्ये घरविक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीत घट झाली आहे. तर कोरोना-कडक निर्बंध आणि मुद्रांक शुल्क दर सवलत बंद झाल्यामुळे ही घट झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

एप्रिलमध्ये घरविक्री आणि महसूलात मोठी घट

author img

By

Published : May 1, 2021, 7:34 PM IST

मुंबई - कोरोना आणि कडक निर्बंधांमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. महसुलाचे अनेक स्त्रोत बंद झाले आहेत. अशावेळी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याला मागील महिन्यात अर्थात मार्चमध्ये तब्बल 9 हजार 66 कोटी रुपये असा विक्रमी महसूल मिळाला होता. पण एप्रिलमध्ये मात्र मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलात आणि घरविक्रीत कमालीची घट झाली आहे. एप्रिलमध्ये राज्यात 94 हजार 813 घरे विकली गेली असून यातून 1 हजार 256 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. तेच मार्चमध्ये तब्बल 2 लाख 13 हजार 413 घरे विकली गेली होती आणि यातून विक्रमी असा 9 हजार 66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकूणच एप्रिलमध्ये घरविक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीत घट झाली आहे. तर कोरोना-कडक निर्बंध आणि मुद्रांक शुल्क दर सवलत बंद झाल्यामुळे ही घट झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

सप्टेंबर अखेरीस देण्यात आली होती 'ही' सवलत
कोरोना आणि कडक निर्बंधाचा मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसत असून नवीन प्रकल्प येणे बंद झाले आहेत. प्रकल्पाची कामे मंदगतीने सुरू आहेत. असे असले तरी घरविक्री-खरेदी व्यवहार बऱ्यापैकी वर्षभर सुरू आहेत. त्यातही सप्टेंबर अखेरीस राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात 2 आणि 3 टक्क्यांनी सवलत दिली डिसेंबर 2020 पर्यंत ही सवलत लागू होती. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 1 आणि 2 टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा ग्राहकांना होत असल्याने, हजारो, लाखो रुपयांची बचत होत असल्याने ग्राहकांनी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करण्यास मोठ्या संख्येने सुरुवात केली. परिणामी घरविक्री आणि महसुलात ऑक्टोबरपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. डिसेंबर 2020 मध्ये राज्यात 2 लाख 55 हजार घरे विकली गेली. तर या घरविक्रीतून तब्बल 2 हजार 464 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. 2020 मधील ही विक्रमी घरविक्री आणि महसूल होता. सवलतीचा लाभ मोठ्या संख्येने ग्राहकांनी घेतला.

मार्च 2021 मध्ये राज्यात मुद्रांक शुल्क वसुलीचा विक्रम
राज्यात मार्च 2020पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याचा मोठा फटका एप्रिलमधील मुद्रांक शुल्क वसुलीला झाला. एप्रिलमध्ये राज्यात केवळ 3 कोटी 94 लाख रुपये इतकाच महसूल मिळाला होता. पण त्यानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली. महसूल आणि घरविक्री वाढत गेली. परिणामी डिसेंबर 2020मध्ये 2 लाखाहून अधिक घरे विकली गेली. तर यातून 2 हजार 400 कोटी रुपयांहुन अधिक महसूल मिळाला. 1 जानेवारीपासून 2 आणि 3 टक्क्यांची मुद्रांक शुल्क दरातील सवलत 1 आणि 2 टक्के अशी झाली. म्हणजेच डिसेंबरपर्यंत काही भागात ग्राहक जिथे 3 आणि 4 टक्के दराने मुद्रांक शुल्क भरत होते, तिथे जानेवारी 2021पासून 4 आणि 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे. यामुळे 2021 मध्ये घरविक्री आणि महसूल कमी होतो का घटतो, याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले होते. पण प्रत्यक्षात या सवलतीचा सगळ्यात मोठा फायदा सरकारला झाला. कारण कधी नव्हे ते एका महिन्यात सरकारच्या तिजोरीत मार्चमध्ये तब्बल 9 हजार 66 कोटी रुपये जमा झाले. मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने इतका मोठा विक्रमी महसूल राज्याला मिळाला. तर 2 लाख 23 हजार 413 घरे विकली गेली. फेब्रुवारी 2021 मध्ये 1 लाख 51 हजार 152 घरे विकली गेली होती तर यातून 1 हजार 282 कोटींचा महसूल मिळाला होता. 1 एप्रिलपासून 5 आणि 6 टक्के दराने मुद्रांक शुल्क वसुली होऊ लागली. त्यात कोरोनाची दुसरी भयानक लाट सुरू झाली. कडक निर्बंध लागू होऊन 15 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागले. या सगळ्यांचा फटका एप्रिलच्या घरविक्रीला बसला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये केवळ 94 हजार 813 घरे विकली गेली असून यातून 1 हजार 256 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान यात मुंबईतील 10 हजार 136 घरांचा तर 514 कोटी महसुलाचा समावेश आहे.

हेही वाचा - 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी रविवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणार सुरू; यंत्रणा सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.