मुंबई - रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात आज मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
Breaking : कडक निर्बंधांत मोहरम मिरवणुकीस हायकोर्टाची परवानगी - etv bharat
20:31 August 17
म्हाडाने तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी कालमर्यादेत करण्याचे गृहनिर्माण मंत्र्यांचे निर्देश
20:30 August 17
चंद्रपूर शहरातील फुटपाथवर आढळले नवजात अर्भक
चंद्रपूर - शहरातील मध्यभागी एक नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर नवजात बालिका आढळली. सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. यावेळी जागरूक नागरिकांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. ह्या नवजात बालिकेला कोणी सोडले याचा शोध पोलीस घेत आहेत.
20:29 August 17
७० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांचा तपास सुरू
नागपूर - गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडी टोल नाक्याजवळ एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. माहेड गिरीजाशंकर सिंग असे मृत महिलेचे नाव आहे.
20:28 August 17
पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारला नोटीस बजाविली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावर न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास करण्यात यावा, अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावर केंद्र सरकार अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणार का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा म्हणाले, की प्रतिसादाबाबत याचिकाकर्त्याचे समाधान नाही, असे उत्तर देऊ नका.
20:26 August 17
सिरमने घेतला स्कॉट काइशा कंपनीमध्ये 50 टक्के हिस्सा
नवी दिल्ली - पुण्याची लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटने भारताला औषधी कंपन्यांचे हब होण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सिरमने स्कॉट काइशा या औषध पॅकिंजिंग कंपनीमध्ये 50 टक्के हिस्सा घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने स्कॉट काइशाची सहमालकी असलेल्या कायरस दादाचनजी आणि शपूर मिस्त्री यांच्याकडून कंपनीचा हिस्सा घेतला आहे. ही माहिती स्कॉट आणि सिरमने संयुक्तपणे दिली आहे.
19:19 August 17
कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्याची मंजुरी देण्यात आली. एका ट्रकवर 15 जणांना मुभा असेल.
18:34 August 17
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? नाना पटोलेंचा सवाल
जालना - भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
18:33 August 17
अमरावती महापालिकेच्या आमसभेत युवास्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
अमरावती - अमरावती महापालिकेच्या मासिक आमसभेत आज युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे शिरून गोंधळ घातला. या गोंधळामुळे आमसभा तहकूब करण्यात आली. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला.
17:54 August 17
राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
पंढरपूर (सोलापूर) - राज्य सरकारकडून मंदिरे का बंद ठेवली जातात, हा प्रश्न आहे. राज्यातील बारमध्ये तसेच मॉलमध्ये जितकी गर्दी होते. त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सुरक्षित अंतर ठेवून मंदिर खुले होऊ शकतात, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
17:54 August 17
कोरोनाच्या भीतीने उच्चशिक्षित दाम्पत्याने घेतला गळफास, कोराना रिपोर्ट आला निगेटिव्ह
मंगळुरू (कर्नाटक) - पोलीस आयुक्तांना आत्महत्या करत असल्याचा फोन लावून एका दम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटक राज्यात घडला. पत्नीला म्यूकरमायकोसिसची लक्षणं जाणवल्याने तीने अगोदर गळफास घेतला आणि त्यानंतर पतीनेही मृत्यूला कवटाळले. मात्र काही वेळाने त्या दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक राज्यातील सुरात्काल येथील चित्रपूर याठिकाणी राहेजा अपार्टंमेन्टमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रमेश कुमार आण गुना कुमार अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत.
17:16 August 17
म्हशीनं घेतला जीव : गळ्याला शेपूट आवळल्याने एकाचा मृत्यू; अनैसर्गिक कृत्याची शक्यता
वानापार्थी (कर्नाटक) - कधी कोणाचा मृत्यू कसा होईल, याबाबत काही सांगता येत नाही. म्हशीच्या शेपटीने गळा आवळून एका व्यक्तीचा विचित्र मृत्यू झाल्याची घटना वानापार्थी जिल्ह्यातील नागावरम् याठिकाणी घडली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
15:42 August 17
...तर 90 टक्के पूर्ण झालेल्या कामाचं श्रेय शिवसेनेला मिळालं पाहिजे - भास्कर जाधवांचा गडकरींना टोला
रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.
13:15 August 17
तालिबानींचे महिलांना सरकारमध्ये समावेशाचे आवाहन
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्ता हस्तगत करत आहेत. त्यामुळे महिला सैरभैर झाल्या आहेत. तसेच विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाणिस्तानमधील महिलांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यातच आता तालिबानने एक सुखद धक्का दिला आहे. तालिबान्यांनी त्यांच्या सरकारमध्येच महिलांनी सहभागे व्हावे असे म्हटले आहे. तसेच महिलांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही तालिबानने जाहीर केले आहे.
12:53 August 17
टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानच्या विरोधात
आयसीसीने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. करोनामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे.
असे रंगणार सामने -
भारत विरुद्ध पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 ऑक्टोबर ,संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - 3 नोव्हेंबर, संध्याकाळी 6 वाजता, अबुधाबी
12:16 August 17
ओबीसी आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य सरकारवर आरोप
नागपूर - ‘ओबीसी आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकार हिसकावून घेत आहेत’ असे म्हणत भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. डिसेंबरपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही, तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा महाविकास आघाडी सरकारला गंभीर इशाराही दिला आहे. याचबरोबर ‘शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला निर्देश द्यावे’ असेही ते म्हणाले.
11:38 August 17
मुंबई- डॉ. डी.एन.एल मूर्ती विरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल
-डॉ. डी एन एल मूर्ती मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत
-थकीत बिलाचे पेमेंट करण्यासाठी मागितली 20 लाखाची लाच
-20 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
-प्रकरणाचा अधिक तपास सुरू
11:29 August 17
माजी गृहमंत्री अनिल गृहमंत्री यांना ईडीने बजावला समन्स
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं समन्स
- चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावला,
- उद्या (बुधवारी) 18 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश
09:20 August 17
मालेगावमध्ये अनधिकृत बायोडिझेल पंपावर छापा
नाशिक ब्रेकिंग -
- मालेगावमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई
- अनधिकृत पणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा
- काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील शेख चालवत होता अनधिकृत पंप
- नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई
- त्याच्याच मालकीच्या हॉटेलमागे पत्र्याच्या शेडमध्ये उभा केला होता अनधिकृत डिझेल पंप
- पंपावर मिळणाऱ्या डिझेलपेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने विकत होता बायोडिझेल
09:13 August 17
अफगाणिस्तान संदर्भातील आपला निर्णय योग्यच - बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला परत बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये एवढ्या लवकर तालिबानी यशस्वी होतील असे वाटले नव्हते असेही ते म्हणालेत. व्हाइट हाऊसमधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीला अफगाणी नेते जबाबदार असल्याचं ते म्हणाले.
08:51 August 17
BREAKING - राज्यात आढळले डेल्टा प्लसचे 76 रुग्ण
राज्यात डेल्टा प्लसचे 76 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यात 100 नागरिकांची तपासणी होत आहे, जे कोणी बाधित आढळत आहेत त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. कोरोना आणि डेल्टा प्लसच्या लक्षणात आणि उपचारांमध्ये फार काही फरक नाही. त्यामुळे काळजी करण्याचे विषय नसला तरी आपण काळजी घेतली पाहिजे, असे टोपे खामगाव येथे म्हणाले