ETV Bharat / city

शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! 36,902 रुग्णांची नोंद

author img

By

Published : Mar 26, 2021, 10:10 PM IST

राज्यात गेल्या 24 तासांत 17 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 22 लाख 00 हजार 056 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात शुक्रवारी 36,902 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 112 रुग्णांचा मृत्यु झाला.

शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! 36,902 रुग्णांची नोंद
शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! 36,902 रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारीही कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 36 हजार 902 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 735 वर गेली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे.

राज्यात सातत्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात अनेक शहरांत कडक निर्बंध असूनही रुग्णसंख्येला वेसण बसत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 17 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 22 लाख 00 हजार 056 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात शुक्रवारी 36,902 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 112 रुग्णांचा मृत्यु झाला. सध्या राज्यातील मृत्युदर 2.04 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 26 लाख 37 हजार 735 वर गेली आहे. सध्या राज्यात 2 लाख 82 हजार 451 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती

  • राज्यात गेल्या 24 तासांत 17 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त
  • राज्यात आतापर्यंत एकूण 22 लाख 00 हजार 056 रुग्णांची कोरोनावर मात
  • राज्यात नव्या 36,902 रुग्णांची नोंद
  • राज्यात 112 रुग्णांचा शुक्रवारी मृत्यु, राज्यातील मृत्युदर 2.04 टक्के
  • राज्यात एकूण 26 लाख 37 हजार 735 रुग्णांची नोंद
  • राज्यात एकूण सक्रीय रुग्ण 2 लाख 82 हजार 451

    राज्यात कोणत्या भागात किती रुग्ण?
  • मुंबई महानगरपालिका- 5,515
  • ठाणे- 439
  • ठाणे मनपा- 1020
  • नवी मुंबई-694
  • कल्याण डोंबिवली- 794
  • उल्हासनगर मनपा- 125
  • मीराभाईंदर- 265
  • पालघर- 130
  • वसई विरार मनपा-216
  • रायगड-216
  • पनवेल मनपा-363
  • नाशिक-1281
  • नाशिक मनपा-2080
  • मालेगाव- 164
  • अहमदनगर- 571
  • अहमदनगर मनपा-247
  • धुळे- 208
  • धुळे मनपा - 224
  • जळगाव- 967
  • जळगाव मनपा- 254
  • नंदुरबार-513
  • पुणे- 1686
  • पुणे मनपा- 3,379
  • पिंपरी चिंचवड- 1,782
  • सोलापूर- 325
  • सोलापूर मनपा- 279
  • सातारा - 487
  • सांगली- 155
  • औरंगाबाद मनपा-1563
  • औरंगाबाद-310
  • जालना-607
  • हिंगोली- 108
  • परभणी मनपा-164
  • लातूर मनपा-326
  • लातूर 203
  • उस्मानाबाद-179
  • बीड -387
  • नांदेड मनपा-617
  • नांदेड-491
  • अकोला- 190
  • अकोला मनपा-369
  • अमरावती-137
  • अमरावती मनपा- 143
  • यवतमाळ-447
  • बुलडाणा-342
  • वाशिम - 329
  • नागपूर- 1102
  • नागपूर मनपा-3055
  • वर्धा-289
  • भंडारा-273
  • चंद्रपूर-151

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील सूचना केल्या असून मदत व पुनर्वसन विभागाकडून याचे आदेश निर्गमित व्हावे असेही म्हटले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यातील कोरोनासंदर्भातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यात लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जनतेने नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात रक्ताचा तुटवडा

कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे निरोगी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मुंबई सध्या सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांनी 28 दिवस रक्तदान करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्यात लॉकडाऊनविषयी 2 एप्रिलला निर्णय - अजित पवार

पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. मात्र यासंदर्भात 2 एप्रिलला निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

अंत्यसंस्कारासाठीही वेटींग

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. तर अंत्यसंस्कारासाठीही वेटींग लिस्ट असल्याची स्थिती राज्यात दिसत आहे. नाशिक आणि नांदेडमध्येही अंत्यसंस्कारासाठी जागाच मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये जमीनीवरच अंत्यसंस्कार होत आहे. तर नांदेडमध्ये स्मशानभूमीत वेटींग लिस्ट असल्याची स्थिती दिसत आहे.

हेही वाचा - कोरोनासह इतर आजारांमुळे मृतांच्या संख्येत वाढ; स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांग..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.