ETV Bharat / city

मुंबई अग्निशमन दलातील 25 टक्के पदे रिक्त, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती

वाढत्या आगीच्या घटनांमुळे मुंबई अग्निशमन दलाला हायटेक बनवल्याची चर्चा आहे. मात्र, मुंबईकरांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या या दलात 25 टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशामकाची आहे.

author img

By

Published : Sep 7, 2020, 6:36 AM IST

RTI activist anil galgali  mumbai fire brigade news  mumbai fire brigade vacancies  mumbai fire brigade  मुंबई अग्निशमन दल न्यूज  मुंबई अग्निशमन दल रिक्त पदे  मुंबई अग्निशमन दल  आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली
मुंबई अग्निशमन दलातील 25 टक्के पदे रिक्त

मुंबई - मुंबईत आग लागली, घर, इमारत किंवा झाड कोसळले की बचावासाठी अग्निशमन दलाला बोलावले जाते. मात्र, मुंबईकरांच्या बचावासाठी असलेल्या या दलात तब्बल 25 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

मुंबई अग्निशमन दलातील 25 टक्के पदे रिक्त, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलातील एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त जागा याबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे माहिती मागितली होती. मुंबईत आगी लागण्याच्या घटना नेहमीच समोर येतात. सतत आगी लागत असल्याने आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे, इमारत, घर कोसळल्यास, अथवा आपत्ती काळात नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांचा बचाव करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलात 3694 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2760 पदे भरण्यात आली असून 934 पदे रिक्त आहेत, असे गलगली यांनी सांगितले.

अग्निशामकांची 604 पदे रिक्त -

वाढत्या आगीच्या घटनांमुळे मुंबई अग्निशमन दलाला हायटेक बनवल्याची चर्चा आहे. मात्र, मुंबईकरांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या या दलात 25 टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशामकाची आहे. यात 2340 पैकी 604 पदे रिक्त आहेत. यानंतर 159 चालक यंत्रचालकाचे पद रिक्त आहे. 69 प्रमुख अग्निशामक, 66 दुय्यम अधिकारी, 17 वरिष्ठ केंद्र अधिकारी, 10 केंद्र अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. उपमुख्य तांत्रिक अधिकारी हे पद सुद्धा रिक्त आहे.

या व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यशाळेमध्ये 29 प्रकारची 125 पदे आहेत. त्यापैकी 62 पदे रिक्त आहेत आणि 66 पदावर कर्मचारी कार्यरत असल्याचे गलगली यांनी सांगितले. अनिल गलगली यांनी 25 टक्के रिक्ततेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबई अग्निशमन दल हा महत्त्वाचा विभाग तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा विभागात पद रिक्त असल्याने गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.