ETV Bharat / city

Animals Hospital: प्राण्यांसाठी २४ तास फिरते सुसज्ज रुग्णालय; राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Animals Hospital: मानव समाजात प्राण्यांपेक्षा मानवाची किंमत आणि मोल उपयुक्तवादानुसार अर्थात अधिक आहे. अमूल्य आहे हे जितकच खरं आहे. तसेच मानव समाजात प्राण्याचे देखील मोल आहे. म्हणून मांसाहारी, शाकाहारी असलेल्या जगामध्ये देखील प्राण्यांची किंमत होते. 24 hour well equipped hospital प्राण्यांच्या जीवनाचे मोल आहे .म्हणूनच प्राण्यांच्या संदर्भात देश आणि राज्य पातळीवर कायदे देखील आहेत. animals Inaugurated by Governor त्यामुळे आपणाला भूतदया व परोपकार या पारंपारिक संकल्पना याचा प्रत्यय येतो. प्राण्यांना 24 तास सेवा देणारे फिरते सुसज्ज रुग्णालय नुकतेच सुरू झालेले आहे. अशा फिरत्या रुग्णालयाच्या ऍम्ब्युलन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. हा उपक्रम समस्त महाजन ट्रस्ट यांच्यावतीने मुंबईवर सुरू करण्यात आला आहे.

Animals Hospital
Animals Hospital
author img

By

Published : Oct 6, 2022, 6:38 PM IST

मुंबई मानव समाजात प्राण्यांपेक्षा मानवाची किंमत आणि मोल उपयुक्तवादानुसार अर्थात अधिक आहे. Animals Hospital अमूल्य आहे हे जितकच खरं आहे. तसेच मानव समाजात प्राण्याचे देखील मोल आहे. म्हणून मांसाहारी, शाकाहारी असलेल्या जगामध्ये देखील प्राण्यांची किंमत होते. 24 hour well equipped hospital प्राण्यांच्या जीवनाचे मोल आहे .म्हणूनच प्राण्यांच्या संदर्भात देश आणि राज्य पातळीवर कायदे देखील आहेत. animals Inaugurated by Governor त्यामुळे आपणाला भूतदया व परोपकार या पारंपारिक संकल्पना याचा प्रत्यय येतो. प्राण्यांना 24 तास सेवा देणारे फिरते सुसज्ज रुग्णालय नुकतेच सुरू झालेले आहे. अशा फिरत्या रुग्णालयाच्या ऍम्ब्युलन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. हा उपक्रम समस्त महाजन ट्रस्ट यांच्यावतीने मुंबईवर सुरू करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

अनुकंपा नावाची योजना अनुकंपा म्हणजे सहानुभूती तो भाव लक्षात घेऊन ही योजना सुरू समस्त महाजन ट्रस्टने केली आहे. मुंबईसारख्या आकाराने मोठ्या आणि लोकसंख्येने अफाट अशा महानगरात हजारो अपघात होतात. हजारो नागरिकांना दवाखान्यासाठी उपचाराची गरज असते. तसेच हजारो शेकडो प्राण्यांना देखील जसे कुत्रे, मांजरे, कबूतर, पोपट, गायी, म्हशी आणि बैल अशा अनेक प्राण्यांना तात्काळ औषध उपचार आणि मानवी प्रेमाची गरज असते. याच भावनेने समस्त महाजन ट्रस्टने मुंबईवर 10 ठिकाणी फिरते अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालय सुरू केलेले आहे. समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने अरहम अनुकंपा या नावाने प्राण्यांना सेवा देण्याचे योजना सुरू केली आहे, अशी माहिती परेश शहा यांनी दिली आहे.

मोकाट जनावरे, पाळीव प्राणी सर्वांना २४ तास सेवा समस्त महाजन ट्रस्टने गुजरातमध्ये मोकाट गुरांचे रक्षण, पाळीव प्राण्यांचे रक्षण करण्याचे सामाजिक काम केलेलं आहे. मात्र मुंबईमध्ये देखील त्यांनी आता जे पाळीव प्राणी असतील किंवा मोकाट जनावर असतील ज्यांचे अपघातात होतात. ते जखमी होतात किंवा अचानक त्यांची सुद्धा तब्येत बिघडते. किंवा कोणी त्यांना मारतं. त्यांच्या अंगावर गरम तेल फेकलं जातं. त्यांना मार मार मारले जाते. अशावेळी ते जखमी होतात. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने फिरते मोबाईल रुग्णालय 24 तास उपलब्ध केलेले आहेत. त्यामध्ये एक चालक आणि प्राण्यांचा डॉक्टर देखील उपलब्ध असतो. अशी माहिती या संपूर्ण योजनेचे समन्वयक परेश शहा यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली आहे.

मुंबई ते कल्याणपर्यंत फिरते रुग्णालय विरार, भाईंदर ,बोरिवली, अंधेरी, दादर, घाटकोपर, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईसह मुंबई शहर अश्या 12 ठिकाणी प्राण्यांसाठीचे फिरते रुग्णालय सुसज्ज रुग्णालय आहेत. कुठल्याही नागरिकाने जखमी किंवा आजारी प्राणी संदर्भात फोन केल्यास तात्काळ फिरते रुग्णालय डॉक्टर त्या ठिकाणी दाखल होतात. या संबंधित प्राण्याला तात्काळ आवश्यक असलेल्या उपचार सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात.

10 किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरते रुग्णालय आतापर्यंत 1690 इतक्या प्राण्यांना गेल्या 2 महिन्यात त्यांनी मरता मरता वाचवलेल आहे. त्यांना औषध उपचार केलेले आहेत. काहींच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. संबंधित डॉक्टरांकडे त्या प्राण्यांना तपासणी करून त्यांना पूर्ववत करण्याकडे वाटचाल झालेली आहे, असे देखील परेश शाहा यांनी नमूद केले आहे. 12 प्राण्यांचे डॉक्टर आणि बारा ड्रायव्हर हे 24 तास यासाठी उपलब्ध असतात जेणेकरून जनतेचा कुठूनही फोन आल्यास तात्काळ या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरते रुग्णालय त्या ठिकाणी पोहोचते. 25 लाखाची एक ऍम्ब्युलन्स त्यामध्ये सुसज्जता, औषध आणि प्राण्यांचा डॉक्टर याची सर्व व्यवस्था ही समस्त महाजन या ट्रस्टनेच केलेली आहे. प्राण्यांच्यासाठी कोणी फारसं पुढाकार घेत नाही. जे पुढाकार घेतात, ते तुलनेने कमी संख्येने आहे. त्यामुळेच महाजन ट्रस्टने यावर लक्ष केंद्रित केल्याचं परेश शाहा यांनी सांगितले. ९१५२९९५३९९ या व्हाट्सअप क्रमांकावर संदेश केला, कि ते आपल्याशी संपर्क करतात. जनतेने या क्रमांकावर संर्पक करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.