ETV Bharat / city

बार्ज पी-305 दुर्घटना : नौदलाने वाचवले अनेकांचे प्राण; 60 जणांचा मृत्यू, बचावकार्य अद्यापही सुरुच - बार्ज पी 305 बचाव

तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत.

BARGE P 305
बार्ज
author img

By

Published : May 21, 2021, 7:49 PM IST

Updated : May 21, 2021, 8:45 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या मृतदेहांपैकी २३ जणांची ओळख पटली आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल

अरबी समुद्रात पी-३०५ हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा - सॉरी पापा, आत्महत्या करतीय! व्हिडीओ करुन तरुणीने संपवलं आयुष्य

मृतांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष

शुक्रवारी(21 मे) सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक जेजे रुग्णालयामध्ये पोहोचले. परंतु, रुग्णालयामध्ये येलोगेट पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर मृतदेह हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित नसल्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना मनस्ताप झेलावा लागला. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.3

मृतांचे नातेवाईक आणि ओएनजीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची -

पी 305 बार्ज दुर्घटनेप्रकरणी मृतांचे नातेवाईक आणि ओएनजीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. कंपनीकडून पाच लाख रुपये मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली होती. तसेच प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार - मुंबई पालकमंत्री अस्लम शेख

एवढं मोठे वादळ येणार याची कल्पना दिली असताना, हे सगळं घडले आहे. याला पूर्णपणे ओएनजीसी कंपनी जबाबदार आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 51 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. ओएनजीसी कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहीजे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

हेही वाचा - शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, उद्दीष्टामध्येही दीडपट वाढ

Last Updated : May 21, 2021, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.