ETV Bharat / city

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 124 पदे तातडीने भरणार, मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश

22 मार्च 2012 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लिपीक-टंकलेखक पदभरती वरील निर्बंध शिथील करण्यात आला आहेत. गट 'क'मधील लिपीक-टंकलेखक यांच्या एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

author img

By

Published : Oct 1, 2020, 8:42 AM IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 124 पदे तातडीने भरणार, मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश

मुंबई - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती तातडीने केली जाणार आहे. यामध्ये हे गट 'क' व गट 'ड' मधील विविध संवर्गातील 124 पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात दिली.

22 मार्च 2012 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लिपीक-टंकलेखक पदभरती वरील निर्बंध शिथील करून गट 'क'मधील लिपीक-टंकलेखक यांच्या एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील सहा वर्षांतील विविध शासन निर्णयानुसार लिपीक टंकलेखकांची ही पदे भरली जाणार आहेत. तर मागील वर्षी भरण्यात आलेल्या आणि मंजूर झालेल्या 15 पदांना वगळून इतर 124 अनुकंपा धारकांची संवर्गनिहाय पदभरती करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणा संदर्भात विचारल्यानंतर गुलाबराव पाटील हे एक प्रकारचे पिल्लू सोडल्याचे टीका केली आहे. राज्यातील पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारला कसे बदनाम करता येईल, यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु मुंबईलाच नव्हे तर महाराष्ट्रात पोलिसांना बदनाम करण्याचा हा डाव त्यांनी अगोदरच आखला होता. बिहारच्या निवडणुका तोंडावर असल्याचे ओळखून त्यांनी हे घडवून आणल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. ज्या मुंबई पोलिसांवर डाग लावण्यात आला त्याच लोकांनी आता उत्तर प्रदेशाच्या पोलिसांकडे लक्ष द्यावे, तिथे दिवसाढवळ्या रोज खून केले जातात, असे पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.