ETV Bharat / city

Kolhapur Water Storage : कोल्हापूरकरांनो आपल्याला यंदा पाण्याची काय कमी नाय; मुबलक पाणीसाठा

उन्हाळा आला की अनेक जिल्ह्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षीसुद्धा घाबरण्याचे कारण नाही, कारण जिल्ह्यात आजही मुबलक पाणीसाठा (Water Storage in Kolhapur) आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल अशी सध्याची स्थिती आहे.

kolhapur water storage
कोल्हापूर पाणीसाठा
author img

By

Published : Mar 31, 2022, 7:47 PM IST

Updated : Mar 31, 2022, 7:58 PM IST

कोल्हापूर - पाणीदार जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरची वेगळी ओळख आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस आणि इथे असलेली अनेक धरणे यामुळे कोल्हापूरला ही ओळख प्राप्त झाली आहे. उन्हाळा आला की अनेक जिल्ह्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षीसुद्धा घाबरण्याचे कारण नाही, कारण जिल्ह्यात आजही मुबलक पाणीसाठा (Water Storage in Kolhapur) असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरेल अशी सध्याची स्थिती आहे. पाहुयात यावरचाच आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट...

रोहित बांदिवडेकर - कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

कोल्हापूर आणि इथले एकूण प्रकल्प : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हा आज पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. 100 वर्षांपूर्वी त्यांनी राधानगरी धरणाची बांधणी केली होती. आजही हे धरण भक्कमपणे उभे असून कोल्हापूरवासियांची तहान भागवत आहे. खरंतर त्यानंतर जिल्ह्यात अनेक धरणे तसेच छोटे मोठे प्रकल्प झाले आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात 4 मोठे प्रकल्प, 10 मध्यम प्रकल्प आणि तब्बल 55 लघु प्रकल्प आहेत. या सर्वच धारणांमध्ये सद्यस्थितीत 55 टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठी उपलब्ध आहे त्यामुळे हा पाणीसाठी पूर्ण उन्हाळ्यात पुरेल इतका असून जिल्ह्याला घाबरण्याची गरज नाहीये.

जिल्ह्यातल्या धरणात सध्या 'इतका' पाणीसाठा :

राधानगरी धरण : 57 टक्के पाणीसाठा शिल्लक
काळम्मावाडी : 55 ते 57 टक्के पाणीसाठा शिल्लक
वारणा धरण : 55 टक्के पाणीसाठा शिल्लक
दुधगंगा : 55 टक्के पाणीसाठा शिल्लक
कोयना : 57 टक्के पाणीसाठा शिल्लक

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही मुबलक पाणी साठा : कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे कोल्हापूरसह या परिसराला पाणी टंचाईच्या झळा यावर्षी बसणार नाहीयेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा समाधानाची गोष्ट आहे. कोयना, वारणा, चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी या सगळ्याच मोठ्या धरणात पाण्याची स्थिती उत्तम आहे. मे अखेर ते जुलै पर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक असल्याचेही पाटबंधरे विभागाचे अभियंता बांदिवडेकर म्हणाले.

यावर्षी कोणतीही उपसा बंदी असणार नाही : पाणीसाठा कसा आहे हे पाहून या विभागाला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. पिकांपेक्षाही आपला जीव महत्वाचा आहे त्यामुळे पिण्यासाठी साठा कमी असतो तेंव्हा महत्व दिले जाते. त्यानुसार योग्य वेळी उपसा बंदी सुद्धा घातली जाते. मात्र यंदा जून अखेरपर्यंत पाणी पुरेल इतका साठा सद्या जिल्ह्यातल्या धरणांमध्ये आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही पद्धतीने उपसा बंदी असणार नाही अशी माहिती सुद्धा अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.

Last Updated : Mar 31, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.