ETV Bharat / city

Kolhapur North By Election : एसटी कर्मचाऱ्यांचा महाविकास आघाडीला विरोध, भाजपला पाठिंबा - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक बातमी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. मात्र, आता संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आता बंड पुकारले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीसाठी (Kolhapur North By poll) एसटी कर्मचाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देत मेळावा घेतला आहे.

st workers
एसटी कर्मचारी मेळावा
author img

By

Published : Mar 31, 2022, 3:13 PM IST

Updated : Mar 31, 2022, 3:55 PM IST

कोल्हापूर - गेल्या शंभर दिवसहून जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. मात्र, आता संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आता बंड पुकारले आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीसाठी (Kolhapur North By poll) एसटी कर्मचाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देत मेळावा घेतला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील तब्बल ७०० हून अधिक एसटी कर्मचारी या मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला होते. मात्र, हा अल्टीमेटम धुडकावून लावत एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा निर्धार येथील एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोल्हापुरातील बालाजी गार्डन येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या हा मेळावा पार पडला असून या मेळाव्यात कोल्हापूर उत्तर निवडणुकीचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी, एसटी कामगार नेते उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया

एस टी कर्मचारी महाविकास आघाडी विरोधात उभे : गेल्या पाच ते सहा महिन्यापासून राज्यशास्त्र मध्ये विलीनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत ते मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रयत्न केले तर अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई चा बडगा उगारला आहे. तरीही एस टी कर्मचारी संपावर ठाम असून आता आक्रमक झालेले कर्मचारी महाविकास आघाडी विरोधात उभारले आहेत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देत मतदान करण्याचे जाहीर केले आहे. सर यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निर्धार मेळावा देखील घेतला आहे. तसेच राज्यातील ९२ हजार एस टी कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांनी राजकारण सुरू करत असून रोज अनेक ६८ हजार प्रवाशी प्रवास करत असतात यामुळे आम्ही प्रत्येक इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी विरोधात काम करू असा इशारा एस टी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

सरकारचा अल्टिमेटम धुडकावून संप सुरूच : एस टी कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसापासून संप सुरू आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना ३१ मार्च पर्यंत कामावर येण्याचा अल्टिमेटम दिला होता मात्र हे अल्टिमेटम डावलून कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे सरकार वारंवार येत असून हा सरकारचा आठवा अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना आहे मात्र सरकारने हा प्रश्न अडवून ठेवण्यापेक्षा जर निकाले लावला असता तर ही वेळ आली नसती. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सरकार चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाने येत्या पाच तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा 31 मार्चपर्यंत हजर राहण्याचा अल्टिमेटम देणारे काय एस टी चे मालक आहेत का असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.तसेच हे सरकार विविध युनियन मार्फत मत घेत असतात मात्र आता जो पर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा थेट इशारा सरकार ला दिला आहे.

Last Updated : Mar 31, 2022, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.