कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी विक्रमी 61.19 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम ( Satyajeet Kadam BJP ) तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव ( Jayashri Jadhav INC ) रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांकडून मागील 15 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आले होते. यामध्ये 61.19 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ( Gaurdian Minister Satej Patil ) या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूरात महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. मात्र, मतदारराजा कोणाला कौल देणार? हे उद्या 16 एप्रिल रोजी समजणार ( Kolhapur North By Election Result ) आहे. त्यामुळे याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले ( BJP Vs Mahavikas Aghadi In Kolhapur ) आहे.
वयोगटानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 हे पुरुष मतदार, तर 1 लाख 46 हजार 068 स्त्री मतदार आहेत. 12 तृतीयपंथी मतदार आहेत. तर, सैन्य दलातील मतदाराची संख्या ही 95 इतकी आहे.
वयोगटानुसार मतदार :
वय वर्षे 18-19 - 3082
वय वर्षे 20-29 - 46459
वय वर्षे 30-39 - 59381
वय वर्षे 40-49 - 61658
वय वर्षे 50-59 - 53157
वय वर्षे 60-69 - 36302
वय वर्षे 70-79 - 20496
80 वर्षावरील - 11263
असे झाले मतदान : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 78 हजार 542 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामध्ये एकूण पुरुषांच्या मतदानापैकी 64.49 टक्के पुरुषांनी मतदान केले तर एकूण महिलांच्या मतदानापैकी 57.89 टक्के महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. इतर मदारांच्या एकूण संख्येपैकी 27 टक्के जणांनी मतदान केले.
'हे' 15 उमेदवार होते रिंगणात :
1) जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात)
2) सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ)
3) यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी)
4) विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा)
5) शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर)
6) सुभाष देसाई (चिन्ह - सोड रोलर)
7) बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर)
8) भारत भोसले (चिन्ह - कपाट)
9) मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन)
10) अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड)
11) अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर)
12) करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र)
13) राजेश नाईक (चिन्ह - किटली)
14) राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी)
15) संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद)
हेही वाचा : चंद्रकांत दादांनी भाजपच्या 'त्या' तिघांवर आता ईडी लावावी - पालकमंत्री सतेज पाटील