ETV Bharat / city

राज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करा; मी ठरल्याप्रमाणे राजसदरेवरून पुढील दिशा घोषित करेन - संभाजीराजे - elebrate the coronation ceremony at home

सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याची माझी जबाबदारी आहे असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरूनच घोषित करेल असेही संभाजीराजे यांनी म्हटले.

खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे
author img

By

Published : Jun 3, 2021, 1:48 PM IST

कोल्हापूर - यावर्षी सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचा जीव पहिला महत्वाचा आहे. केवळ 20 लोकांना गडावर जाण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी गडावर जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करेन, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढिल दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन, असेही खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या दिशेसंदर्भात स्पष्ट केले आहे.

राज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करा
राज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करा
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र करण्याची तयारी सर्वच मराठा संघटनांनी केली आहे. त्यातच कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापर्यंत सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय स्पष्ट करण्याची वेळ दिली आहे. त्यानंतर ते स्वत: रायगडावरून आपली पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या दरम्यान रायगडावर साजऱ्या होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला कोरोना नियमांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी जनतेला रायगडावर न येण्याचे आवाहन केले आहे. सलग दुसऱ्या वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा - दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिवभक्त हजेरी लावत असतात. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार या सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू न देता गेल्यावर्षी 20 लोकांची उपस्थिती मध्येच राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावर्षीही कोरोनाचे संकट अधिक आहे. सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. गेल्यावर्षी सर्वांनी गडावर येऊ नये या आवाहनाला सर्व शिवभक्तांनी प्रतिसाद दिला होता. त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहून साजरा करण्याचे आवाहन करत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.