कोल्हापुर एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशातच कोल्हापूर शहराजवळ असलेल्या एका गावातून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वडीलाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत गेल्या 2 वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले (Father forcibly had sexual relations daughter) होते. मात्र, आता तर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्याने हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे. याबाबत संबंधित बापाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
2020 पासून बापाचे घृणास्पद कृत्य दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरानजीक असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत तिच्या बापाने 2020 पासून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. याबाबत तिने वारंवार विरोध केला. मात्र, बापाने किळसवाणे कृत्य सुरुच ठेवले होते. मात्र, नुकतेच संबंधित अल्पवयीन मूलगीला त्रास होत असल्याचे जाणवल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले असता मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.
नराधमावर गुन्हा दाखल याबाबत चौकशी केली असता पीडित मुलीने आपल्या बापानेच हे कृत्य केले असल्याची पोलिसांना फिर्याद दिली. याबाबत संबंधित बापाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत संतापजनक प्रतिक्रीया येत आहेत.