कोल्हापूर - महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. मायक्रो प्लॅनिंग करूनच तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा बोल्ड उडणार हे नक्की असल्याचा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बॉलिवूडवरून पालकमंत्री सतेज पाटील यांची भाजपवर निशाणा साधला आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्राच्या ठिकाणी जाऊन पालकमंत्री पाटील भेट देऊन मतदान कशा पद्धतीने झाले याचा आढावा घेत आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
★ विश्वजित कदम महाविकास आघाडीचा एकनिष्ठ प्रचार करत आहेत -
हेही वाचा - योगींचा पंगा मुंबईशी आहे का? - संजय राऊत
विश्वजित कदम व संग्राम देशमुख यांच्या भेटीला इतर संदर्भ देणे योग्य नाही. कदम गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा एकनिष्ठ प्रचार करत आहेत. त्यामुळे समोरासमोर भेट झाल्यानंतर नमस्कार वगैरे होत असतो. त्यामुळे इतर संदर्भ योग्य नाहीत असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा - योगी यांच्या मुंबई दौऱ्याविरोधात मनसेची बॅनरबाजी, योगींना म्हणाले "ठग"
★ भाजप मुंबईची शान संपवण्याचा प्रयत्न करतंय -