ETV Bharat / city

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे; 1500 बेड वाढवावेत - मुश्रीफ

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने 1 हजार 500 बेड वाढवावेत, असे आदेश देऊन, जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकरीता सुमारे 340 इंजेक्शन उपलब्ध झाले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : May 29, 2021, 9:02 AM IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे. त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

म्युकरमायकोसिस रुग्णांकरिता 340 इंजेक्शन प्राप्त

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने 1 हजार 500 बेड वाढवावेत, असे आदेश देऊन जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकरीता सुमारे 340 इंजेक्शन उपलब्ध झाले असल्याचे मुश्रीफ यांना सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात 100 ऐवजी 200, मुरगुड ग्रामीण रुग्णांलयात 25 ऐवजी 50, तर कोडोली ग्रामीण रुग्णालयात 100 बेड निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच इचलकरंजीतील आयजीएम रुग्णांलयातही बेड वाढविण्यात येणार असून, सिटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी डॅश बोर्ड तयार करण्यात यावा

यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड मुळे झालेल्या मृत्यूदराचे ऑडीट करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी. तसेच ज्या रुग्णांलयानी जास्त बिले घेतली आहेत, अशांची तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी डॅश बोर्ड तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच मे महिन्याअखेर कोरोना आजाराचा ग्राफ (आलेख) खाली येईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जिल्ह्यासाठी लवकरच ग्रामविकास विभागाच्या वतीने यंत्रसामग्रीने युक्त अशी कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यादृष्टीने शासकीय रुग्णालयांतून सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोविड व म्युकरमायकोसिसच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बेड व्यवस्थापन, लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, औषध पुरवठा, लसीकरणाची सद्यस्थिती, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील सोयी-सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला.

हेही वाचा - 'प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.