ETV Bharat / city

चिथावणीखोर भाषण न करता संयमाने दौरा करावा, सोमैया यांना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा सल्ला - kirit somaiya's kolhapur tour

लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. तसेच कोल्हापुरात आल्यानंतर सोमैया यांनी जिल्हा बँकेचे कामकाज पहावे. तसेच आमच्या सामाजिक व राजकीय कामकाजाही आढावा घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Sep 27, 2021, 3:41 PM IST

कोल्हापूर - लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता संयमाने आपला दौरा पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

बोलताना हसन मुश्रीफ

सोमैया यांनी आमचे सामाजिक-राजकीय काम

मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमैया हे मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. लक्ष वेधण्यासाठी सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता आपला दौरा संयमाने पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन त्यांनी आमचे सामाजिक-राजकीय काम पाहावे. जिल्हा बँकेचे उल्लेखनीय काम आणि वाढता नावलौकिक कामाचा आढावा घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमैया हे शिळ्या कढीला उत आणत आहेत

अकरा वर्षांपूर्वी कारखान्याची उभारणी झाली आहे. मात्र, एका कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक यांनी राजकीय विरोधकाबाबत योग्य टिप्पणी केली. जर मुश्रीफ यांनी घोटाळा केला असता तर आम्ही विरोधक म्हणून त्याच वेळी त्यांचे भांडाफोड केला असता. मात्र, किरीट सोमैया हे शिळ्या कढीला उत आणत आहेत, अशी भावना अनेकांची आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे केले आवाहन

किरीट सोमैया उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा - परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन, पोलीस यंत्रणेचेही दुर्लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.