ETV Bharat / city

भाजप पदाधिकारी व पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य टाहो मोर्चा - Chandrakant Patil at flood victims morcha

पूररग्रस्तांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याच्या मुद्द्यावरून भाजप ( Chandrakant Patil at flood victims morcha ) आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पूरग्रस्तांचा ( Morcha of flood victims at kolhapur ) टाहो मोर्चा काढण्यात आला.

Massive Morcha of BJP at kolhapur District Collectors office
पूरग्रस्त मोर्चा कोल्हापूर चंद्रकांत पाटील उपस्थिती
author img

By

Published : Jun 1, 2022, 2:26 PM IST

कोल्हापूर - पूररग्रस्तांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याच्या मुद्द्यावरून भाजप ( Chandrakant Patil at flood victims morcha ) आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पूरग्रस्तांचा ( Morcha of flood victims at kolhapur ) टाहो मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करण्यात येत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Families Outcast Issue : वाळीत टाकण्याचा प्रकारच नव्हे, 'तो' तर भावकीतला वाद; खासदार धैर्यशील मानेंनी सोडवला वाद

या मोर्चामध्ये पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पूरग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत, दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला व मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरला महापुराचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी देखील कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. यावेळी महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही त्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पूरग्रस्तांचा टाहो मोर्चा काढण्यात आला.

टाहो मोर्चाचे नेतृत्व स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व पूरग्रस्त मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला जाब विचारण्यात आला असून पूरग्रस्तांच्या मदतीमधील भ्रष्टाचार थांबावा व चौकशी करा. तसेच पूरग्रस्तांना त्वरित योग्य नुकसान भरपाई द्यावी, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.

या आहेत मुख्य मागण्या

1. भ्रष्टाचार थांबवा व त्यांची चौकशी करा.

2. पूरग्रस्तांना त्वरित योग्य नुकसान भरपाई द्यावी.

3.कोल्हापूर शहरातील जयंती नाला सह सर्व नाले ओढे यांची सफाई करावी.

हेही वाचा - धक्कादायक..! 7 ते 8 कुटुंबांना टाकले वाळीत, सैन्यातील जवानाच्या कुटुंबाचाही समावेश, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.