ETV Bharat / city

शिक्षकांवर अत्याचार होत असतील तर गय करणार नाही- जयंत आसगावकर

याप्रकरणी शिक्षण संस्थाचालकांची, कोअर कमिटीची बैठक येत्या सोमवारी मुख्याध्यापक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, खाजगी शिक्षण मंडळ यासह शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील.

जयंत आसगावकर
जयंत आसगावकर
author img

By

Published : Jan 2, 2021, 4:49 PM IST

कोल्हापूर - जय भारत शिक्षण संस्थेत शिक्षक व शिक्षिकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रार माझ्याकडे आली आहे. याची चौकशी येत्या सोमवारी बैठकीत केली जाईल, यातील दोषींची गय करणार नाही, असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिला.

जयंत आसगावकर

येत्या सोमवारी कोअर कमिटीची बैठक-

आमदार आसगवकर म्हणाले, जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थाचालक परशुराम जाधव हे शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अत्याचार करत असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. सर्व शिक्षकांनी माझ्याकडे भूमिका मांडली आहे. त्यानुसार आज मी या ठिकाणी येऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने शिक्षण संस्थाचालकांची, कोअर कमिटीची बैठक येत्या सोमवारी मुख्याध्यापक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, खाजगी शिक्षण मंडळ यासह शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. असे आमदार जयंत आसगावकर सांगितले.

शिक्षकांकडून संस्थाचालकांवर आरोप-

कोअर कमिटीच्या बैठकीत प्रशासकीय यादव सर देखील उपस्थित असतील. या बैठकीत जे काही आरोप शिक्षकांकडून संस्थाचालकांवर केले गेले. त्याची संपूर्ण माहिती आणि चौकशी केली जाईल. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे देखील आमदार जयंत आजगावकर यांनी सांगितले. तर शिक्षकांकडून संस्थाचालकांवर आरोप झाले असतील तर त्याची देखील चौकशी या बैठकीत केली जाईल. यातून शैक्षणिक व्यासपीठ योग्य न्याय-निवाडा करेल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा देखील आमदार आसगावकर यांनी दिला.

कोंडून ठेवलेले शिक्षकांना आमदारांनी काढले बाहेर-

दरम्यान, अत्याचार झालेल्या शिक्षकांनी या शाळेवर मोर्चा काढला होता. तर सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या शाळेमुळे शिक्षक शाळेत उपस्थित होते. मात्र उपस्थित शिक्षकांनी तोंड उघडू नये म्हणून संस्थाचालकांनी काही शिक्षकांना वर्गात कोंडून ठेवले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला. यावेळी आमदार जयंत आजगावकर यांनी स्वतः वर्गात जाऊन या शिक्षकांना बाहेर काढले व संस्थाचालकांकडून तुमच्यावर अन्याय होतोय, का अशी विचारणा केली.

कारवाईची छडी उगारावी लागणार-

संस्था, शाळेच्या नावावर नोकरीची भिती घालून शिक्षकांना संस्थाचालक गुलामासारखे वागवत आहेत. कधी लोकप्रतिनिधींशी नातेसंबंध सांगत तर कधी बड्या अधिकाऱ्यासोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत शिक्षकांना त्रास देत आहेत. अशावेळी शिक्षण विभाग व समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेण्याची गरज आहे. एक-दोघा बेलगाम संस्थाचालकांच्या गैरवर्तणुकीने शिक्षण क्षेत्राचे नाव खराब होणार नाही, हे पाहणे सार्वजनिक जबाबदारी आहे. तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या जाणत्या मंडळीवर अधिक जबाबदारी आहे. त्यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी कारवाईची छडी उगारावी लागणार आहे.

हेही वाचा- 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.