ETV Bharat / city

वर्षभर हलगी थांबली, पण तरुणांची संस्कार शिदोरी पोहचली - Kolhapur Latest

गेल्या वर्षभरापासून हलगी वादक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्य शासनाकडून कोणतीच मदत होत नसल्याने अखेर कोल्हापूरातील युवा सेना या हलगी वादकांच्या मदतीला धावली आहे. संस्कार शिदोरीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील 50 गरजू हलगीवाल्यांना 1 महिन्याची मदत केली आहे.

वर्षभर हलगी थांबली, पण तरुणांची संस्कार शिदोरी पोहचली

author img

By

Published : May 16, 2021, 8:50 AM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात अनेक धार्मिक, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने, हजारो हलगी वादकांची हलगी वाजली नाही. या पारंपरिक व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालात असे. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आल्याने जगणे अवघड झाले आहेत. मात्र तरुणांनी दाखवलेल्या प्रेमामुळे त्यांना एक महिन्याची संस्कार शिदोरी मिळाली आहे. मिळालेल्या मदतीमुळे हलगी वादक भारावून गेले.

वर्षभर हलगी थांबली, पण तरुणांची संस्कार शिदोरी पोहचली

हलगी वादकांना मदत करण्याची कल्पना

गेल्या वर्षभरापासून हलगी वादक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्य शासनाकडून कोणतीच मदत होत नसल्याने अखेर कोल्हापूरातील युवा सेना या हलगी वादकांच्या मदतीला धावली आहे. संस्कार शिदोरीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील 50 गरजू हलगीवाल्यांना 1 महिन्याची मदत यावेळी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे अनेक रोजगार बंद झाले आहेत. छोट्या-मोठ्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे दिवाळे निघाले आहेत. दिवसभर राबले तरच रात्रीची चूल पेटते, अशा हलगी वादकांना मदत करण्याची कल्पना या तरुणांमध्ये आली आहे.

५० हलगी वादकांना महिन्याचे साहित्य

शहरातील निवडक अशा गरजू 50 हलगी वादकांना युवासेनेच्या व संस्कार शिदोरीच्या वतीने एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले आहे. शहरातील वारे वसाहत, शिवाजी पेठ, राजाराम पुरी मातंग वसाहत, मंगळवार पेठ याठिकानी जाऊन हलगी वादकांना करण्यात आली आहे.

हलगी वादकांच्या मदतीसाठी आवाहन

वर्षभर सर्व कार्यक्रम, सण बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी हा व्यवसाय सोडून भाजीपाला विक्री सुरू करून उदरनिर्वाह सुरू केला आहे. समाजाने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा - 'महाराष्ट्राने कोरोनाच्या आकडेवारीत लपवाछपवी केली नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.