ETV Bharat / city

पालकमंत्री सतेज पाटील यांनी साधला कोरोना रुग्णांशी संवाद - सतेज पाटील यांचा कोरोना रुग्णांशी संवाद

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर शहरातील गृह विलगीलकरण केलेल्या रुग्णांशी फोनवरून आणि व्हिडीओ कॉल करून संवाद साधून विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी प्रशासनाकडून योग्य सहकार्य होत असल्याचे सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

Guardian Minister Satej Patil
पालकमंत्री सतेज पाटील
author img

By

Published : Apr 17, 2021, 8:06 PM IST

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर शहरातील गृह विलगीलकरण केलेल्या रुग्णांशी फोनवरून आणि व्हिडीओ कॉल करून संवाद साधून विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी प्रशासनाकडून योग्य सहकार्य होत असल्याचे सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णांसोबत फोन वरून चर्चा करून त्यांच्या तब्बेतची विचारपूस केली.

★कोल्हापूर शहरातील ६३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणात :

कोल्हापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोल्हापूर शहरातील ६३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून योग्य सेवा, मार्गदर्शन मिळते का नाही याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी रुग्णांशी, फोनच्या माध्यमातून आणि व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी वेगवेगळ्या गृह विलगीकरण असलेल्या रुग्णांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी या रुग्णांनी महापालिका प्रशासनाकडून आपल्याला योग्य सहकार्य केले जात असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणा आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवून आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन केले. तर डॉक्टरांचेही मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

★कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक :

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णापैकी 50 टक्के रुग्ण हे या एकट्या कोल्हापूर शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणा वेळेवर कार्यान्वित करण्यासाठीच्या नियोजनाबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. गेल्यावर्षी एकावेळी २२०० रुग्ण पॉझिटिव्ह येतील याअनुषंगाने सर्व सुविधांचे नियोजन करण्यात आले होते, यंदा मात्र एकावेळी दिवसात ३३०० रुग्ण पॉझिटिव्ह आले तरी यंत्रणा कुठेही तोकडी पडणार नाही असे नियोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे असेही पालकमंत्र्यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा - कोल्हापूर: गोकुळच्या निवडणुकीचा अट्टाहास का? ठरावधारक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.