ठाणे : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Muncipal Corporation) आरोग्य विभागाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याला ओमायक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
Kalyan Dombivali : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' रुग्णाच्या प्रवासामुळे चिंतेत भर
दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) डोंबिवलीत (Dombivali) आलेल्या रुग्णाचे सात नातवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्याने प्रथम विमान आणि नंतर टॅक्सी असा प्रवास केल्याने नागरिकांच्या चिंतेत अजून भर टाकली आहे.