ETV Bharat / city

शिवसेनेला अजित पवारांवर संशय? चंद्रकांत खैरे म्हणाले, अजित पवारांना माहित असून ते बोलत नाहीत

अजित पवार यांना माहीत ( Chandrakant khaire news aurangabad ) आहे तरी ते असे का बोलले माहीत नाही, आतून मिळालेले आहेत का? असा प्रश्न ( Chandrakant khaire doubt on ajit pawar ) निर्माण होतो. जे काही आहे ते उघडपणे सांगावे. शरद पवार साहेब कसे बोलतात तसे, अशी टिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant khaire on eknath shinde rebel ) यांनी केली.

author img

By

Published : Jun 24, 2022, 10:19 AM IST

chandrakant khaire comment on Ajit Pawar
एकनाथ शिंदे बंड चंद्रकांत खैरे प्रतिक्रिया

औरंगाबाद - अजित पवार यांना माहीत ( Chandrakant khaire news aurangabad ) आहे तरी ते असे का बोलले माहीत नाही, आतून मिळालेले आहेत का? असा प्रश्न ( Chandrakant khaire doubt on ajit pawar ) निर्माण होतो. जे काही आहे ते उघडपणे सांगावे. शरद पवार साहेब कसे बोलतात तसे, अशी टिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant khaire on eknath shinde rebel ) यांनी केली.

माहिती देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

हेही वाचा - Sanjay Shirsath to CM Uddhav Thackeray : आम्ही गद्दार नाही; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून... - संजय शिरसाठांचा व्हिडिओ शिंदेंनी केला शेअर

शिरसाठ तर मुंबईत पडीक - औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी काल बरेच आरोप केलेत. उद्धव साहेब भेटत नाही असे ते म्हणाले. मात्र, तुम्ही त्यांना भेटण्याचे प्रयत्न केलेत का? ते रोज भेटू शकत नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी असो की, पंतप्रधान मोदी हे रोज आपल्या लोकांना भेटत नाहीत. मोठ्या लोकांना कामे असतात. आपण का त्यांना व्यत्यय निर्माण करावा. काही तातडीचे काम असेल तर व्हॉट्स अॅप आहे ना, त्यावर का बोलले नाहीत. तुम्ही तर स्वतः आठवड्यातील पाच दिवस मुंबईत असतात. काही लोक तर तुम्ही पडीक असतात, असे म्हणतात. जनसंपर्क सोडून तुम्ही तिकडे का असतात, असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

मोठी रक्कम देण्याचे आमिष - देशात अशीच स्थिती काही राज्यांत आहे. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आता किती पैसे देण्याचे सांगितले तर तो आकडा मोठा आहे. मी सांगितला तर पुन्हा सिद्ध करा, असे म्हणतील. हे सत्य असले तरी सिद्ध करता येणार नाही. हे असे करतील असे कधी वाटलं नव्हते, अशी खदखद शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - MLA Sanjay Shirsath Letter : 'मुख्यमंत्री साहेब..! आम्हाला अशी अवमानास्पद वागणूक का दिली?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.