औरंगाबाद - पंकजा मुंडे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक झाल्या आहेत. यासाठी त्यांचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
खासदार प्रीतम मुंडे तसेच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या उपोषणाला सुरुवात झाली. त्यांच्यासोबत माजी मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उपोषणादरम्यान मराठवाड्याचा पाणीप्रश्न त्यांनी आधोरेखित केला आहे. यावर बोलताना, हे उपोषण अपेक्षांसाठी आहे; आक्षेपांसाठी नाही, असे त्यांनी सांगितले.
12.28 PM : आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय - फडणवीसांचा आरोप
12.25 PM : मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले- देवेंद्र फडणवीस
12.20 PM : मराठवाड्याचे पाणी आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्राकडे पळवून नेलं - फडणवीसांची टीका
12.15PM : पाण्यासाठीच्या या लढ्याचे नेतृत्त्व पंकजा मुंडेंकडेच - फडणवीसांचे सुतोवाच
12.10 PM सरकारने लक्ष दिले नाही तर ही लढाई रस्त्यावर - फडणवीस
12.05 PM : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर दाखल
12.00 PM : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात दाखल