औरंगाबाद - औरंगाबाद महानगर पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाणी पट्टीबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात पाण्याबाबत ओरड सुरु झाल्यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी पन्नास टक्के कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुरेसे पाणी मिळणार कधी असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील ( MIM MP Imtiaz Jaleel ) यांच्यासह मनसेने उपस्थित केला ( Imtiaz Jaleel On Water Crisis ) आहे.
राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी केली वसुल - शहरातील पाणी प्रश्नावर अनेक वेळा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला. आठ दिवसाला पाणी देऊन राज्यातील सर्वाधिक म्हणजे 4050 अशी पाणी पट्टी वसुल केली जात होती. 2016 पासून समांतर पाणी योजना येणार म्हणून पालिकेत ठराव होत आहे. शहरवासियांना वाढीव पाणी मिळणार असल्याने पाण्याचे दर वाढवले. एक दिवस आड पाणी मिळत होते. वाढीव पाण्याची गरज असल्याने नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली. मात्र समांतर पाणी योजना पूर्ण झालीच नाही. तर दुसरीकडे पाणी प्रश्न गंभीर झाला. सध्या आठ दिवसाला पाणी देण्यात येत असून ते देखील अपुरे असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला.
पाणीपट्टी वसुल होईना - शहर वासियांना पाणी देत असताना अनेक अडचणी पालिकेला सामना करावा लागत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा लोकसंख्येच्या मानाने कमी आहे. शहरात 1 लाख 27 हजार अधिकृत नळ कनेक्शन असून पाणीपट्टी वसून अवघी 20 ते 22 टक्के इतकी आहे. अनधिकृत नळ कनेक्शन देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करताना येणारा खर्च अधिक असल्याने पाणी पट्टी जास्त असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली होती.
पैसे परत देण्याची एमआयएमची मागणी - मागील सहा वर्षांपासून शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर त्यातही राज्यात सर्वात महाग पाणी महानगर पालिका देत आहे. पाण्याचा प्रश्न गांभीर झाल्यावर आता पाणीपट्टी कमी केली गेली. इतके दिवस अपुरे पाणी दिले, आणि पैसे पूर्ण घेतलेत. पाणी पट्टी कमी करून प्रश्न सुटणार आहे का? महानगर पालिकेने पैसे भरलेल्या नागरिकांचे पैसे परत द्या अशी मागणी एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
हेही वाचा - केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी कुतुबमिनारच्या उत्खननाचा दावा फेटाळला