ETV Bharat / city

विभागीय आयुक्त जेव्हा खांद्यावर पिशवी घेऊन आठवडी बाजारत दिसले! - sunil kendrekar viral photo

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची खांद्यावर पिशवी घेतलेली बाजारातील छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झालीत. बाजाराची पिशवी खांद्यावर घेऊन पत्नीमागून चालणाऱ्या केंद्रेकरांच्या छायाचित्रांवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्रेकरांनी चक्क खांद्यावर पिशवी घेऊन केला बाजार

author img

By

Published : Jan 17, 2021, 2:58 PM IST

औरंगाबाद - सनदी अधिकारी म्हटलं तर डोळ्यासमोर उभा राहतो वागण्यातला राजेशाही थाट,आलिशान गाडी, आसपास चार-पाच अधिकारी, नोकर आणि आजूबाजूला बॉडीगार्ड. मात्र काही अधिकारी याला अपवाद ठरतात. अशाच एका अधिकाऱ्याचा फोटो समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यासोबत अधिकाऱ्याचं कौतुकही केलं जातंय.

हे आहेत सुनील केंद्रेकर
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या फोटो मध्ये दुसरं-तिसरं कुणी नसुन कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून नावलौकिक मिळालेले औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आहेत. पदाने विभागीय आयुक्त असलेल्या केंद्रेकरांनी खुलताबादमधील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी केला. यावेळी सर्वसामान्यांप्रमाणे पिशवी खांद्यावर घेऊन ते पत्नीसोबत बाजारातून फिरले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारीही नव्हते. त्यामुळं या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

पत्नी पुढे आयुक्त मागे
सुनील केंद्रेकर हे दर शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान खुलताबादेत भद्रा मारुतीच्या दर्शनाला येतात. आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह दर्शनाला आले होते. दर्शन आटोपून ते नेहमीप्रमाणे मंदिर परिसरात भाजीपाला बाजारात पत्नीसह फिरले. त्यांनी भाजीपाला खरेदी केला. यावेळी आयुक्तांच्या पत्नी पुढे तर विभागीय आयुक्त त्यांच्या पाठीमागे चालत होते. विभागीय आयुक्तांच्या साधेपणाच कौतुक होत आहे.

हेही वाचा - 'सरकारी पातळीवर लवकरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.