औरंगाबाद - तुझ्या मुलीसह तुझा संभाळ करेन' म्हणत लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील भावाने घटस्फोटीत बहिणीवर अत्याचार केला. यामध्ये 'ती' गर्भवती राहिल्यानंतर मुलीला मारुन टाकीन अशी धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच, पाच लाख रुपयेही त्यांच्याकडून लुटले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocities on a divorced sister In Aurangabad) पांडुरंग उर्फ राहुल रामेश्वर ईप्पर (२४, रा. हिरवड, ता. लोणार, सध्या रा. नंदी वाईन शॉपमागे, भोईवाडा मिल कॉर्नर) असे या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार ११ जुलै २०२१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान भोईवाडा आणि समर्थनगरातील हॉटेमध्ये घडला आहे.
पीडितेचे पाच लाख रुपये आरोपीने घेतले
याप्रकरणी २७ वर्षीय फिर्यादीच्या तक्रारीनुसार ती आणि आरोपी राहूल हे दूरच्या नात्यातून बहिण भाऊ लागतात. तिचा घटस्फोट झाल्याने ती खचलेली असतानाचा फायदा घेत आरोपी राहूलने फिर्यादीला 'आयुष्यभर तुझ्या मुलीसह तुला सांभाळेन' असे म्हणत फिर्यादीसह तिच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला. (He had an abortion threatening his sister ) दरम्यान, फिर्यादला पोटगीतून मिळालेले १ लाख ७५ हजार तसेच तिच्या आईचे दागिने मोडून आलेले आणि घरातील असे पाच लाख रुपये आरोपीने घेतले.
कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी
या कालावधीत आक्टोबर २०२१ फिर्यादी गर्भवतील राहिली. मात्र, आणखी कायद्यानुसार आपले लग्न झाले नसल्याने तोपर्यंत गर्भ ठेऊ नको म्हणत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच आपल्या संबंधाबद्दल कोणाशी बोलशील तर तुझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
प्रतिक्रिया
सदर प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमोल सोनवणे करत आहेत.
-डॉ.गणपत दराडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,क्रांती चौक पोलिस स्टेशन