औरंगाबाद - पुरग्रस्तांच्या मदात निधीसाठी भाजप महिला आघाडीने शहरात अनोखा उपक्रम राबवला. व्यापाऱ्यांना राखी बांधून ओवळणीच्या स्वरूपात मदत निधी जमा करण्यात आला.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी राज्यातून विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात मदत पोहचत आहे. होणारी मदत मोठी असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या आवाहनाला औरंगाबाद भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद हा उपक्रम राबवला.
कोल्हापूर - सांगली परिसरात पूर ओसरला असला तरी राज्यातून मोठी मदत पूरग्रस्तांना दिली जात आहे. कपडे, अन्नधान्य, औषधी मदत स्वरूपात येत आहे. पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याच आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याला औरमगाबाद मधून भाजप कार्यकर्त्यानी प्रतिसाद दिलापूरग्रस्त भावांना मदत देण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने व्यापाऱ्यांना राखी बांधून ओवाळणी स्वरूपात मदत निधी घेतला. पैठणगेट भागातील व्यापाऱ्यांना महिलांनी राखी बांधत मदत देण्याच आवाहन केलं. 13 तारखेपासून 17 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम शहरातील विविध भागांमध्ये राबवण्यात येणार आहे. 18 ऑगस्टला जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करणार असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.