औरंगाबाद पैठण पोळा म्हटला Aurangabad Paithan Bull Hive Festival की, बळीराजा आपल्या बैलांना वेगवेगळ्या प्रकारे सजवत असतो. सर्वात आकर्षक आणि चांगली बैलजोडी आपली दिसावी यासाठी तो प्रयत्न करतो. मात्र, पैठण तालुक्यातील पाटेगाव या गावातील एक बैल चांगला चर्चेत आला आहे. कारण बैलाच्या पाठीवर Writing Sentences On Bull on Bull Hive Festival चक्क पन्नास खोके एकदम ओके, असे वाक्य Fifty Boxes are Absolutely OK लिहिलेले होते. त्यामुळे राजकीय टीका करणारा Baliraja Criticized on Government हा बैल चांगलाच चर्चेत आला आहे.
बैलाने वेधले लक्ष पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या सर्वत्र प्रिय असलेल्या बैलांना साजशृंगार करतो. यात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सजवले जाते. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचे पडसाद अधिवेशनात दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेला संघर्ष सर्वांनीच पहिला. मात्र, या संघर्षाचे पडसाद गावागावात दिसून आले.
शिवसेनेशी एकनिष्ठ ग्रामीण मतदारांची खोचक टीका शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या ग्रामीण मतदारांनी बळीराजाची पोळ्याच्या दिवशी खोचक टीका करणारे वाक्य बैलाच्या अंगावर लिहीत टीका केली. पैठण तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या अंगावर, पन्नास खोके एकदम ओके, असे लिहून शिंदे गटातील आमदारांनी पैसे घेत केलेली बंडखोरीबाबत टीका करण्यात आली. तीदेखील शहाजी बापूच्या स्टाईलमध्ये.
मराठा आरक्षणाकडे वेधले लक्ष बैलपोळाच्या निमित्ताने काही शेतकरी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा काम करतात. अशीच एक मागणी कडे सर्वाचे लक्ष केंद्रीत केले. ते म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्नाकडे. काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजावट करत असताना "एक मराठा लाख मराठा" अस वाक्य लिहून, मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याच काम केले