ETV Bharat / city

...तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल-पोलीस आयुक्तांचा इशारा

शिवजयंतीमध्ये प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करायचे आहे. तसेच शिवजयंती साजरी करत असताना कोणीही मिरवणूक काढू नये, विनापरवानगी मिरवणूक काढल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता यांनी दिला आहे.

author img

By

Published : Feb 18, 2021, 10:18 PM IST

Updated : Feb 18, 2021, 10:36 PM IST

पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद
पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

औरंगाबाद - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर, नाईट कर्फ्युचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळ प्रसंगी दिवसाचा कर्फ्यु लावावा लागेल, अशा इशारा औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला. वेळीच सावध व्हा... नियम पाळा, अन्यथा परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये पाचवी ते बारावी या वर्गात, दहावी आणि बारावी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक राहणार नाही, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त मस्त कुमार पांडेय यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल तर त्यांनी शाळेला तसा अर्ज करून ते शाळेत जाऊ शकतात. अन्यथा विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन क्लासद्वारे अभ्यास करावा लागणार आहे. हा निर्णय 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अस्तिककुमार पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल-

हेही वाचा-भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शिवजयंती साजरी करा, मात्र रॅली नको....
शिवजयंतीमध्ये प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करायचे आहे. तसेच शिवजयंती साजरी करत असताना कोणीही मिरवणूक काढू नये, विनापरवानगी मिरवणूक काढल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता यांनी दिला आहे. लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे तसेच मास्क वापरावे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचावे, म्हणून पत्रकारांची मदत घेतली जात आहे. तसेच लोकांनासुद्धा जबाबदारीने वागावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

हेही वाचा-सलग 9 तास समुद्रात पोहत 12 वर्षीय मुलीने रचला विक्रम

190 मंगल कार्यालयांना देण्यात आली नोटीस

ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णांमध्ये घट दिसून आले. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातनंतर रुग्ण संख्या ही वाढत चालली आहे. वाढता धोका लक्षात घेता मंगल कार्यालय हॉटेल आणि इतर गर्दी होणार या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषता: लग्नसमारंभात होणारी गर्दी पाहता 190 मंगल कार्यालयांना महानगरपालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे. जे मंगल कार्यालय कोरोनाचे नियम पाळणार नाही अशा मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस आणि शाळांवरदेखील लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आणि मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडेया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Last Updated : Feb 18, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.